शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

Gondia: क्रेडिट कार्डवर लोन काढायचे अन् गंडवायचे, टोळीला अटक

By नरेश रहिले | Published: December 10, 2023 1:39 PM

Gondia Crime News: क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून ७ लाखांचे लोन घेऊन ७० टक्के रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलने केला आहे.

- नरेश रहिलेगोंदिया - क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून ७ लाखांचे लोन घेऊन ७० टक्के रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलने केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ डिसेंबर रोजी करण्यात आली.

सडक-अर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथील होमगार्ड धनराज पुंडलिक सयाम (३०) यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये क्रेडिट कार्डवर ७ लाख रुपयांचे लोन मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केले. त्यांच्या नावावर ७ लाखांचे लोन मंजूर झाले असताना आरोपींनी त्यांच्या अकाउंटवर फक्त २ लाख ३७ हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. उर्वरित ४ लाख ६३ हजार रुपये त्यांच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी वर्ग केली. त्यांच्याबरोबर इतर लोकांचीही फसवणूक केली आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपींवर भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे, पोलिस उपनिरीक्षक चावके, पोलिस हवालदार विठ्ठल ठाकरे, रंजित बिसेन, खेमचंद बिसेन, हंसराज भांडारकर, अतुल कोल्हटकर, योगेश रहिले, चालक घनश्याम कुंभलवार यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. आरोपींमध्ये यांचा समावेशसिद्धांत चव्हाण (३०), रा. खाडीपार, प्रवीण पाटील (२७), रा. देवरी, कैलाश भोयर (३५), रा. चोपा, निखिलकुमार कोसले (२५), विक्कीसिंग कोसले (२३), नीलेश सुन्हारे (२०), तिन्ही रा. रायपूर व कैलाश भोयर (३५) यांच्यासह इतर साथीदार यांचा समावेश आहे. आरोपींना नागपुरातून केली अटकपोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांनी स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल व नक्षल सेल येथील पोलिस अधिकारी अंमलदारांची पथके तयार केली होती. त्या आरोपींना नागपूरवरून ताब्यात घेण्यात आले. अनेकांची फसवणूक केल्याची दिली कबुलीअटक करण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी क्रेडिट कार्डद्वारे लोन मिळवून देण्याच्या नावावर बऱ्याच लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक करीत आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी क्रेडिट कार्डद्वारे लोन मिळवून देण्याच्या नावावर बऱ्याच लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस