ठळक मुद्देवाहतुकीचा खोळंबा
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा-तुमसर मार्गावरील बिरसीजवळील पूल गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला. यामुळे तिरोडा आणि तुमसरचा संपर्क तुटला आहे.तर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले भरून वाहत आहेत. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता.