लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा कजार्ची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे अशक्य आहे. शेतकऱ्यांची होणारी अडचण, त्यांना व्याजाचा अतिरिक्त भूर्दंड बसू नये यासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शासनाने पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाला सुध्दा मुकावे लागणार होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २२ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी आणि जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना सुध्दा कर्जाची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे कठीण होते. तर पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही ३१ मार्च असल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) मोबाईलवरुन संयुक्तपणे चर्चा करुन पीक कर्जफेडीस ३० जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. राजेंद्र जैन यांनी यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल आणि पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सुध्दा यासंदर्भात चर्चा करुन मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेतला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.१११ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही अंत्यत सोपी असल्याने शेतकऱ्यांना ही बँक आपली बँक वाटते.त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी याच बँकेतून पीक कर्जाची उचल करतात. खरीप हंगामात जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकऱ्यांनी एकूण १११ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. तसेच खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाच्या तुलनेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर होती.जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासाकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची झालेली अडचण लक्षात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी (दि.३०) पीक कर्जाची परतफेड करण्यास ३ महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरपीक कर्जार्ची उचल केलेल्या शेतकºयांना त्याची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत बँकानी दिली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. वेळेत कर्जाची परफेड केली नाही तर व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागेल तसेच शासनाच्या योजनेचा सुध्दा लाभ मिळणार नाही ही चिंता मागील आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना सतावित होती. मात्र जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची ही मोठी चिंता दूर झाली आहे.२२ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करण्याची अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात संचालक मंडळाने संयुक्तपणे चर्चा करुन पीक कर्जाची परतफेड करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितार्थ घेतला आहे.- राजेंद्र जैन, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया.
गोंदियाच्या जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेने दिली पीक कर्जफेडीस ३ महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 7:31 PM
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्दे संचालक मंडळाचा पुढाकारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय