ठळक मुद्देजिवीतहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: येथील जिल्हा कांग्रेस कमिटीचे कार्यालय असलेल्या भोलाभवन इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र या आगीमुळे थोडया फार प्रमाणात नुकसान झाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.