लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा नागपूर विभाग अव्वल ठरला असून जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१३ टक्के लागला.येथील शांताबेन मनोहरभाई ्रकनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी आदिती भक्तवर्ती हिने ९४.९२ टक्के गुण घेवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती विद्यालयातील प्रितीश मस्के व अवंती राऊत यांनी ९३.६९ टक्के गुण घेऊन द्वितीय तर तृतीय क्रमांक येथीलच ओंकार मोहुर्ले याने ९३.५८ टक्के गुणे घेऊन पटकाविला आहे. वाणिज्य शाखेतून विवेक मंदिर स्कूलचा विद्यार्थी जयेश रोचवानी याने ९८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर कला शाखेतून अर्जुनी -मोरगाव येथील सरस्वती विद्यालयातील सागर जांभूळकर याने ८७.५४ टक्के गुण घेऊन पटकाविला आहे. जिल्ह्यातून कला, विज्ञान, वाणिज्य, व्होकेशनल शाखेतून एकूण २० हजार २८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १९ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १२०५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.५५, कला शाखेचा ८९.२९, वाणिज्य शाखेचा ९४.८१ तर व्होकेशनल शाखेचा निकाल ८८.२८ टक्के लागला आहे.
नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 2:31 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा नागपूर विभाग अव्वल ठरला असून जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१३ टक्के लागला.
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९४.१३ : १२०५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत