नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाचे मोठे प्रमाण असल्यामुळे येथील कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात राष्ट्रीय पोषाहार पुनर्वसन केंद्र सुरू केले. या पोषाहार केंद्रात मागील तीन महिन्यात दाखल करण्यात आलेल्या ९४ बालकांपैकी ८४ बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर पडली आहेत.जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अंगणवाडी, उपकेंद्र व ग्रामीण रूग्णालयातून कुपोषणग्रस्त बालकांना १४ दिवसासाठी या पोषाहार पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाते. गावपातळीवर व्हीसीडीसी व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर महिनाभर सीटीसी या विशेष शिबिरातून ही वजन न वाढणारी बालके येथील पोषाहार केंद्रात दाखल करण्यात आली. या पोषाहार पुनर्वसन केंद्रात बालरोग तज्ज्ञ व डायटीशियन व समुपदेशिका यांच्या संयुक्त चमूने तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केला.पोषण पुनर्वसन केंद्रात भरती केल्यावर त्या बालकास पाच वेळा वेगवेगळा पोषाहार सारिका तोमर आणि आहारतज्ज्ञ स्वाती बन्सोड यांच्या देखरेखीत देण्यात आला. बालरोगतज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी बालकांना अत्यावश्यक मायक्रो सप्लिमेंट्स व व्हिटामीन ए व डी चे डोजेस देण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे ८४ बालकांना पोषाहार पुनर्वसन केंद्रातून नवसंजीवनी मिळाली.
मागील पंधरवड्यात तुमखेडा येथून रेफर झालेल्या आठ महिन्याच्या बाळाचे वजन फक्त दीड किलोते १० बालक दुर्धर आजारीगंगाबाईच्या पोषाहार केंद्रात मागील तीन महिन्यात दाखल झालेल्या ९४ बालकांपैकी १० बालकांची अवस्था ‘जैसे थे’ आहे. त्या बालकांना उपोषणापेक्षा दुर्धर आजार व व्यंगत्व असल्यामुळे ते आजारी आहेत. गर्भावस्थेतच गर्भवतींची योग्य देखरेख होत नसल्यामुळे पोटातील बाळाची वाढ होत नाही. परिणामी व्यंगत्व घेऊनच बाळ जन्माला येते. त्यामुळे गर्भावस्थेतच महिलांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे.