लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाळेतून निघाल्यावर परत त्याच येण्यासाठी कधी वेळ मिळाला नाही. मात्र आपल्याला जीवन जगणे शिकविणाऱ्या शाळेचे हे ऋण फेडण्याची संधी क्वारंटाईनमुळे मिळाली. या शब्दातून २ युवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी क्वारंटाईन कालावधीत ग्राम हिरडामाली येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला चकाचक करून टाकले आहे.परराज्य व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना ग्रामीण भागात सध्या गावातील शाळेतच क्वारंटाईन केले जात आहे. त्यानुसार, तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथील २ युवकांना पुणे व नागपूरवरून आल्याने गावातीलच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.कित्येक वर्षांनंतर शाळेत आलेल्या या युवकांना त्यांच्या शाळेतील आठवणींनी हेलावून सोडले व तेव्हाचे क्षण त्यांच्या डोळ््या पुढे येऊ लागले. याच शाळेने माणूस बनवून जगात वावरण्याची व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिकवण दिली व आपण काहीच देऊ शकलो नाही असे त्यांना वाटू लागले. अशात शाळेचे ऋण फेडण्यासाठीच क्वारंटाईन होण्याची पाळी आल्याचे मानत त्यांनी शाळेत स्वच्छता सुरू केली.शाळेतील कॅरीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना सकाळ-संध्याकाळ पाणी देणे व कचरा काढण्याचे काम सुरू केले.शाळेच्या आवारात अनेक मोठी झाडे असून उन्हाळ््यात झालेल्या पानगळीमुळे पटांगणात जमा झालेला कचरा व शाळा झाडून त्यांनी स्वच्छ केली.त्यांनी केलेल्या या परिश्रमानंतर शाळेतील झाडे डोलत असून स्वच्छता बघून कित्येक दिवस ही शाळा बंद होती असे कुणीही बोलू शकणार नाही.
मातीत राहायला मिळाल्याचा आनंदवेळेअभावी शाळेत यायला मिळत नव्हते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांना उपस्थिती दर्शविता येत नव्हती. मात्र आता ‘लॉकडाउन’च्या काळात ह्याच शाळेच्या सहवासात, इथल्या मातीत राहायला मिळाल्याचा आंनद त्यांच्या चेहºयावर दिसला. तर मनातील भावना गीतातून व्यक्त केल्या.