लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्पदंशाने रविवारी (दि.१४) मृत्यू झालेल्या एका आठ वर्षीय बालकाला चोवीस तासात जिवंत करण्याचा दावा मध्यप्रदेशातील सेवाधाम येथील डॉक्टरांनी केला होता. मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होणे शक्य नाही, हा सर्व प्रकार अंधश्रध्दा वाढविणारा आहे. त्यामुळे पोलिसांनी चोवीस तासात जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्याला सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला. डॉक्टरांना पोलिसांनी अटक का केली असा आरोप करीत त्यांना त्वरीत सोडण्यात यावे. या मागणीला घेवून घोटी येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.गोंदिया-कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करुन चार तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.अशी होती घटनाघोटी येथील आदित्य गौतम या आठ वर्षीय बालकाला रविवारी (दि.१४) रविवारी सर्पदंश झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल केले. त्याला येथील डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान घोटी येथील एका व्यक्तीने मध्यप्रदेशातील सेवाधाम येथील आयुर्वेदिक डॉ.नवीन लिल्हारे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लिल्हारे यांनी गौतम कुटुंबीयांना मृतक बालकाला चौवीस तासात जिवंत करण्याची हमी दिली. त्यासाठीच सोमवारी (दि.१५) रात्री डॉ. नविन लिल्हारे व गुणेश लिल्हारे औषधी घेऊन गोरेगाव आले होते. तसेच त्यांनी उपचारासाठी पोलीसांचे सहकार्य मागण्यासाठी ते गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे लिल्हारे यांना घोटी येथे मृतक बालकावर उपचार करण्यासाठी जाता आले नाही. पोलिसांनी लिल्हारे यांना ताब्यात घेतल्यानेच बालकावर उपचार होवू शकला नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला. याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी ते दुपारी १ वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मुख्य बस स्थानक, तहसील कार्यालय, दुर्गा चौक, हिरापूर रोड येथे टायर जाळून पोलिसांविरुध्द रोष व्यक्त केला. माहुरला जाणाºया एसटी महामंडळाच्या बसच्या काचा फोडल्या. या दरम्यान नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.यामुळे गोरेगावात तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविलीया आंदोलना दरम्यान गोरेगावला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. डुग्गीपार, देवरी, ग्रामीण पोलीस स्टेशन गोंदिया पोलीस स्टेशनमधून अतिरीक्त कुमक मागविण्यात आली. अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले,रमेश बरकते गोरेगावात तळ ठोकून होते.
डॉक्टरचा पलटवारमृत व्यक्तीला जिवंत करण्याची हमी देणाऱ्या डॉ.नविन लिल्हारे यांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगून त्या मुलाला जिवंत करु शकणार नाही असे सांगीतले. डॉक्टरांच्या या पलटवाराने गावकरी वेगवेगळ्या चर्चा करीत होते. विशेष म्हणजे मुलाच्या अंगावर सूज आल्याची जाणीव व दवाखान्यात त्याला मृत घोषीत केल्याची कल्पना नाही. आपण साप चावल्यावर २४ तासात औषधपचार करुन कुणालाही जीवदान देवू शकतो असे सांगत पलटवार केला.तिघांवर गुन्हा दाखलयाप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी नविन लिल्हारे राहणार मध्यप्रदेश कटंगी, भुनेश लिल्हारे मध्यप्रदेश कटंगी व इंद्रकुमार बघेले रा. म्हसगाव गोरेगाव यांच्यावर १६ आॅक्टोबरला रात्री १२.३० वाजता कलम ३(१), (२)(३) महाराष्ट्र नरबळी,अनिष्ठ प्रथा व अघोरी काळा जादू अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला.माझ्या मुलावर औषधोपचार करण्यासाठी आलेल्या सेवाधाम येथील डॉक्टरांना सोडा, त्यांना आमच्यापर्यत येवू द्या, त्यांनी उपचार केल्यास माझा मुलगा जिवंत होऊ शकतो.- शिला गौतम(मृतक बालकाची आई)