शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
3
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
5
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
6
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
7
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
8
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
10
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
11
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
12
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
13
चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम
14
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
15
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित
16
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
17
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
18
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
19
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
20
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?

Gondia: ...अखेर ‘त्या’ १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द, शिक्षण सहसंचालकांचे आदेश, गोंदियातील नियमबाह्य शिक्षक भरती

By नरेश रहिले | Published: July 16, 2024 7:26 PM

Gondia News: गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी कोरोना कालावधीत जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक मान्यता वर्ष २०१७ पासून २०२० मध्ये दिल्या होत्या.

- नरेश रहिलेगोंदिया - जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी कोरोना कालावधीत जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक मान्यता वर्ष २०१७ पासून २०२० मध्ये दिल्या होत्या. त्या मान्यता नियमबाह्य व बेकायदेशीर असल्यामुळे १ जुलै २०२४ रोजी शिक्षण सहसंचालकांनी (पुणे) शिक्षण उपसंचालकांचे (नागपूर) आदेश कायम करून सर्व १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील या १६ शिक्षकांच्या मान्यता नियमबाह्य व बेकायदेशीर असल्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी (नागपूर विभाग) नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे व्यथित होऊन नुकतीच मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात (नागपूर खंडपीठ) याचिका दाखल केली होती. शिक्षण उपसंचालकांनी मान्यता रद्द करताना संबंधित कर्मचाऱ्यांना सखोल कारणे दाखवा नोटीस न दिल्यामुळे मान्यता रद्द करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश रद्द करून एक महिन्याच्या आत शिक्षण सहसंचालकांनी (पुणे) सुनावणी घ्यावी; तसेच एक महिन्याच्या आत सुनावणी घेतली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू करावे, असे देखील आदेश दिले; परंतु शिक्षण सहसंचालकांनी दिलेल्या मुदतीच्या आत सुनावणी न घेतल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश देण्यात आले; परंतु नुकतेच १ जुलै २०२४ रोजी शिक्षण सहसंचालकांनी शिक्षण उपसंचालकांचे आदेश कायम करून सर्वच १६ शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्या आहेत. ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द- मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांत विनोद हेमराज जगणे, जी.एम. हरीणखेडे (सेजगाव हायस्कूल, सेजगाव, ता. तिरोडा), एम.पी. समरीत, एस.पी.डोंगरे (गणेश हायस्कूल, गुमाधावडा, ता. तिरोडा), निशा विजयसिंग नागपुरे, (एसएसपीडी हायस्कूल, म्हसगाव, ता. गोरेगाव), दीपिका गुलाब दमाहे (स्वामी विवेकानंद हायस्कूल, सोनपुरी, ता. सालेकसा), कमलेश शालिकराम ठाकूर, संजय ग्यानीराम बिरनवार, (हरिदास भवरजार स्कूल, गणखैरा, ता. गोरेगाव), महेश शिवसागर बडोले, ममता जगतलाल अंबुले (फुलीचंद भगत हायस्कूल, कोसमतोंडी, ता. सडक-अर्जुनी), अनिता प्रेमलाल मेंढे, हिमाशी युगल मोहन (परशुराम विद्यालय, मोहगाव, ता. गोरेगाव), शालू धनराज कोटांगले, प्रियांका मुखरू शामकुळे (अमृताबेन पटेल हायस्कूल, रिसामा, ता. आमगाव), स्मिता प्रमोद कटरे (डॉ. आंबेडकर माध्यमिक विद्यालय, सरकारटोला, ता. आमगाव) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक