- कपिल केकतगोंदिया : नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातून संकलीत कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. घराघरांतून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे दिसत आहे. यावरून नगर परिषद स्वच्छतेच्या बाबतीत किती गंभीर आहे हे दिसून येते.
मोक्षधाम परिसरात टाकल्यानंतर कचरा जाळला जात असल्याने गणेशनगर व परिसरातील नागरिकांनी आंदोलनच छेडले होते. त्यानंतर प्रकल्पासाठी जागेचा शोध घेण्यात आला. मात्र जागा काही मिळाली नाही व तीच परिस्थिती निर्माण झाली. यावर नगर परिषदेने हिरडामाली येथील खासगी प्रकल्पात कचरा टाकण्याबाबत व्यवस्था केली आहे. मात्र तेथेही गावकऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर कचरा घेतला जात नव्हता. यावर घंटागाड्या घराघरांतून संकलीत करीत असलेला कचरा रस्त्याच्याकडेला टाकत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी रस्त्याच्याकडेला व मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढिगार लागलेले दिसत आहे.
हा प्रकार सध्या शहरातील प्रत्येकच भागात सुरू असून कर वसुली केली जात असल्याने घरातून कचरा संकलीत करून तो इतरत्र टाकावा एवढेच कार्य स्वच्छता विभागाकडून केले जात असल्याचे दिसत आहे. परिणामी याच गलिच्छ वातावरणात शहरवासीयांना श्वास घ्यावा लागत आहे. स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधी रूपयांची उधळन सुरू असतानाच समस्या स्थिती मात्र जशी होती तशीच आहे. कर विभाग घेते कचरा संकलन करनगर परिषदेने आता कचरा संकलनावर कर आकारले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. असे असतानाच कित्येक दिवस घंटागाड्या येत नसल्याने लोकांच्या घरात कचरा जमत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर मात्र कर विभागाकडून कर घेतला जात असल्याचे स्वच्छता विभागातातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून ते आपली जबाबदारी धुडकावून देताना दिसतात. कर्मचारीच असे बोलत असल्यास स्वच्छता विभाग फक्त स्वच्छता मोहिमेपुरतीच तत्परता दाखविते असे दिसून येते.