लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधींच्या जीवनात अपूर्ण राहिलेले कार्य म्हणजे कुष्ठरूग्णांची सेवा. मधात कुष्ठरूग्णांच्या संख्येत बरीच घट आली होती. परंतु आता कुष्ठरोग व क्षयरोग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या आजारांच्या समूळ उच्चाटणासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात दर दहा हजारांमागे एकाला कुष्ठरोग आहे. महाराष्ट्राची टक्केवारी १ टक्के आहे. परंतु गोंदियाची हीच टक्केवारी २.४८ अशी आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने आरोग्यासंदर्भात जिल्ह्यातील लोक पाहिजे त्या प्रमाणात जागृत नाहीत. जिल्ह्यात कुष्ठरूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्याचा कुष्ठ रूग्णांचा दर १ टक्के असतांना गोंदियात २.४८ टक्के कुष्ठरूग्ण आहेत.त्यांना उपचारही देऊन बरे केले जाते. परंतु जुना आजार असला आणि विकृती आल्यास त्यांचा उपचारही होऊ शकत नाही.उपचार केला तर त्याचा फायदा होत नाही. एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान गोंदिया जिल्ह्यातील ३४६ कुष्ठरूग्णांचा उपचार पूर्ण झाला आहे.डिसेंबर महिन्यात २४ रूग्णांचा उपचार पूर्ण झाला आहे. तर ३५९ रूग्णांवर आजघडीला उपचार सुरू आहे. काही रूग्णांवर वर्षभर तर काही रूग्णांना सहा महिने उपचाराखाली ठेवावे लागते.वेळीच उपचार केल्यामुळे विकृती येऊन येणाऱ्या रूग्णांची संख्या जिल्ह्यात कमी आहे.जिल्ह्यातील १४ बालकांना कुष्ठरोगलहान बालकांच्या आरोग्याची काळजी पालकांच्या बरोबर प्रशासनही घेत असते. तरी देखील गोंदिया जिल्ह्यातील १४ वर्षाखालील १४ बालकांना कुष्ठरोग असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात कुष्ठरोग पाय पसरत आहे.स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग पंधरावाडाकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी २०२० ते १३ फरवरी २०२० पर्यंत कुष्ठरोग व क्षयरोग निवारण पंधरवाडा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने २६ जानेवारी २०२० रोजी प्रत्येक ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये स्पर्श संदर्भात माहिती दिली जाणार आहे.ग्रामसभेत होणार हे वाचनजिल्हाधिकारी यांचे ग्रामसभेममधील घोषणापत्र वाचन करणे, सरपंच यांनी त्यांना दिलेल्या भाषणाचे वाचन करणे, ग्रामसभेला उपस्थित सर्वांनी कुष्ठरोग व क्षयरोग जागरुकता अभियानाबाबत प्रतिज्ञा घेणे,उपस्थित स्थानिक आरोग्य कर्मचाºयामार्फत कुष्ठरोगाविषयी व क्षयरोगाविषयी ग्रामस्थांना माहिती देणे व याविषयी असलेल्या शंकाचे निरसन करणे, कुष्ठरोग्याची प्रतिमा व हक्क संरक्षीत करणेबाबत ठराव घेणे, कुष्ठरूग्णासोबत भेदभाव किंवा दुर्व्यवहार होत असल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाहीचे निर्णय ग्रामसभेत घेण्यात येईल असे फलक लावणे, सदर फलकासाठी लागणारा खर्च ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीच्या उपलब्ध अनुदानातून करणे, कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम गावातील शालेय विद्यार्थी अथवा प्रौढ व्यक्तीस महात्मा गांधीचा (बापू) पेहराव परिधान करुन त्यांच्यामार्फत कुष्ठररोगविषयक जनजागृती तसेच गांधीजींचे कुष्ठरोगावरील कार्य कुष्ठरोगविषयक संदेश देण्यात यावे. अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यापेक्षा गोंदियाचा कुष्ठरोग दर अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने आरोग्यासंदर्भात जिल्ह्यातील लोक पाहिजे त्या प्रमाणात जागृत नाहीत. जिल्ह्यात कुष्ठरूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्याचा कुष्ठ रूग्णांचा दर १ टक्के असतांना गोंदियात २.४८ टक्के कुष्ठरूग्ण आहेत. त्यांना उपचारही देऊन बरे केले जाते. परंतु जुना आजार असला आणि विकृती आल्यास त्यांचा उपचारही होऊ शकत नाही.
ठळक मुद्देजिल्ह्यात ३५९ रूग्णांवर उपचार : ३४६ रूग्णांवर उपचार पूर्ण