- कपिल केकत गोंदिया - दिवाळी सरली असून, थंडीचा जोर आता वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. १७) जिल्ह्याचा पारा घसरला असून, किमान तापमान १४.५ अंशावर आले होते. यामुळे आता सकाळी व सायंकाळ होताच थंडी जाणवत असून, गरम कपड्यांची गरज भासत आहे. येत्या दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार यात शंका नाही.
नवरात्र सुरू होताच थंडीची चाहूल लागते. त्यानुसार, आतापर्यंत रात्री गुलाबी थंडी जाणवत होती. मात्र आता दिवाळी सरली असून, खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, मागील दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. आतापर्यंत १५ अंशावर तापमान आले होते. मात्र शुक्रवारी (दि. १७) पारा आणखी घसरला असून, किमान तापमान थेट १४.५ अंशावर आले आहे. यामुळे हिवाळ्याला सुरुवात झाली असे म्हणता येईल, तर थंडीचा जोर वाढल्यामुळे मात्र जिल्हावासी आनंदी असून, गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहे. थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांना आता गरम कपड्यांची गरज भासताना दिसत आहे. हेच कारण आहे की, आता बाजारातील दुकानांमध्येही गरम कपडे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्हा मागील कित्येक दिवसांपासून विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दोन दिवसांत आणखी जोर वाढणाररविवारी (दि.१९) उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा येऊ घातलेल्या पश्चिमी झंझावाताच्या परिणामातून पडणाऱ्या पाऊस व हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रात थंडी वाढण्यास मदत होणार. तसेच राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. शिवाय, रात्रीच्या तापमानात आणखी घसरण व थंडीची तीव्रता वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
प्रथम पाच शहरांतील किमान तापमानयवतमाळ -१४.०गोंदिया- १४.५वाशिम - १४.६नागपूर- १५.२गडचिरोली- १६.०