- नरेश रहिलेगोंदिया -अंगणात उलटी केल्याने हटकल्यावरून चाकू भोसकून सुनील गोपीचंद डोंगरे (४५) रा. खातिया या काकाचा ३ मार्च २०२१च्या रात्री ९:१५ वाजता खून करणाऱ्या आरोपी पुतण्या शुभम ऊर्फ बालु संतोष डोंगरे (२५) रा. खातिया याला ६ जुलै रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी केली आहे.
ग्राम खातिया येथे ३ मार्च २०२१ रोजी आरोपी शुभम ऊर्फ बालु संतोष डोंगरे (२५) रा. खातिया याने आपल्या घरी वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. यात आरोपीच्या एका मित्राने सुनील डोंगरे यांच्या घराच्या अंगणात उलटी केली. यावरून सुनीलने त्याला हटकले असता आरोपीने सुनील यांच्या पोटावर व छातीवर चाकूने वार करून त्याचा खून केला होता. वाढदिवसात दारूपार्टी करून साऊंडच्या तालात नाचतांना आरोपी शुभमच्या मित्राने सुनिल डोंगरे यांच्या अंगणात उलटी केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणात सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता सतीश घोडे यांनी सरकारची बाजू मांडली.
अशी सुनावली शिक्षाआरोपी शुभम उर्फ बाळू संतोष डोंगरे (२५) रा.खातीया ता. गोंदिया याला भान्यासंच्या कलम २३५(२) द्वारे कलम ३०२ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी आहे. त्याला ५ हजार रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच हजार रूपये दंड न भरल्यास त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास भोगावा लागेल. ४ मार्च २०२१ पासून आजपर्यंत ६ जुलै २०२४ पर्यंत (३ वर्षे, ४ महिने २ दिवस) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४२८ नुसार मुक्त करण्यात यावे.