- नरेश रहिलेगोंदिया - सलग तीन दिवस रेल्वे अपघातात तिघे जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्या तिघांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
गोंदिया तालुक्याच्या मुंडीपार येथील अनंतराम तानू गौतम (७१) या वृध्दाला २३ नोव्हेंबर रोजी मुंडीपारनजीक रेल्वेने धडक दिल्याने त्याला उपचारासाठी दुपारी ४:३० वाजता दाखल करण्यात आले. उपचार घेत असतांना सायंकाळी ७:३० वाजता त्याचा मृत्यू झाला.दुसरी घटना रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिरसोला येथे २४ नोव्हेंबर दुपारी २:१५ वाजता घडली. ४५ ते ४५ वर्ष वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीला रेल्वेने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याचा प्रथमोपचार गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केल्यावर त्याला पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी रवाना करण्यात आले. त्याची ओळख अद्याप पटली नाही.
तिसरी घटना गोंदिया शहराच्या सिंधी कॉलनी येथील रोशन प्रकाशलाल वालानी (३२) यांचा रेल्वे अपघात २२ नोव्हेंबर रोजी झाल्याने त्यांना सायंकाळी ६ वाजता उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.