शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गोंदियातील प्रदूषण नियंत्रणाबाहेर!

By admin | Published: November 22, 2015 1:55 AM

राज्यातील सर्वात जास्त २६० राईस मील गोंदिया जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथे जलप्रदूषणासोबत वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे.

२६० राईस मिल : तपासणीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळच अनभिज्ञगोंदिया : राज्यातील सर्वात जास्त २६० राईस मील गोंदिया जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथे जलप्रदूषणासोबत वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. मात्र दूषित गोंदियाचे प्रदूषण किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीच त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. गोंदियाच्या प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहित नाही. विशेष म्हणजे शहरातील वायूप्रदुषणाची पातळी किती आहे हे मोजणारे यंत्रसुद्धा गोंदियात बसविण्याची गरज या विभागाला इतक्या वर्षात वाटली नाही.रेड मार्क असलेल्या (अतिसंवेदनशिल) उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भातील अहवाल संबंधित कंपनीला दिला जातो. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योग कंपन्यांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मील असून त्यांची दोन वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणीच झाली नाही. राईस मिलमधून फक्त धान पिसवून तांदूळ बनविणाऱ्या २०० तर उष्णा तांदूळ तयार करणाऱ्या ६० राईस मील आहेत. तांदूळ तयार करणाऱ्या या राईस मिलला प्रदूषण मंडळ प्लेन मिल तर उष्णा तांदूळ काढणाऱ्या मिलना पॅरामीट राईस मिल म्हणून संबोधतात. या राईस मिलमुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईसमीलपासून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी मोजणारे यंत्र गोंदिया शहरात नाही. गोंदिया जिल्हा निर्मीती होऊन १५ वर्षांचा कालावभी लोटला, मात्र गोंदियात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साधे कार्यालयसुद्धा नाही. प्रदूषणाची पातळी मोजणारे केंद्रही नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. परंतु राईस मिल मधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. याची तपासणी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतही नाही. केवळ औपचारिकता म्हणून सादर करायचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र कार्यालयात बसूनच बनविले जाते की काय, असा प्रश्न या परिस्थितीवरून पडल्याशिवाय राहात नाही. (तालुका प्रतिनिधी)दोन जिल्ह्यांचा कारभार सांभाळतो एक व्यक्तीभंडाऱ्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी फिल्ड आॅफिसरची तीन पदे रिक्त आहेत. फक्त एक उपप्रादेशिक प्रदूषण अधिकारी कार्यरत आहेत. भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या या कार्यालयात कोणीही फिल्ड आॅफिसर नसताना केवळ एक अधिकारी कसा कारभार करीत असेल यावरून येथील कारभाराची कल्पना येते. यामुळेच गोंदियातील प्रदूषणाची पातळी किती आहे? असे विचारले असता सदर अधिकाऱ्याने त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली. राईस मिल मालक व अधिकाऱ्यांचे साटेलोटे?ज्या ठिकाणी वायूप्रदुषण निर्माण करणारे कारखाने, उद्योग आहेत त्या कोणत्याही शहरात हवा गुणवत्ता मोजणी केंद्र असणे गरजेचे ओ. मात्र गोंदियात राज्यात सर्वात जास्त राईस असताना येथे हे केंद्र अद्याप का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे असे केंद्र गोंदियात असावे यासाठी भंडाऱ्याच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोणताही प्रस्ताव इतक्या वर्षात शासनाकडे पाठविलेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे आणि मिल चालविणाऱ्या मालकांचे साटेलोटे असल्याशी दाट शंका निर्माण झाली आहे.गोंदियात प्रदूषण किती आहे, हे सांगता येणार नाही. राईस मिल्सची तपासणी कधी झाली ते आता सांगता येणार नाही. प्रदूषणाची पातळी मोजण्याचे यंत्र गोंदियात असणे गरजेचे आहे, पण ते आतापर्यंत लागलेले नाही. त्याची कारणे मला माहीत नाही. मी अलिकडेच रुजू झालो आहे. - के.पी. पुसदकरउपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी, भंडारा