लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वरील पादचारी पूल फारच अरुंद असून प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात येथे सुध्दा मुंबईच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हावडा-मुंबई मार्गावरील एक मुख्य रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. शिवाय दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल सुध्दा या रेल्वे स्थानकावरुन मिळतो.दररोज दीडशेच्या आसपास रेल्वे गाड्या या रेल्वे स्थानकावरुन धावतात. तर दहा ते पंधरा हजार प्रवाशी दररोज या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. छत्तीसगड, मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची सुध्दा या रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. प्रवाशी आणि रेल्वे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वे विभागाने गोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास करीत फलाटांची संख्या वाढविली. सध्या या रेल्वे स्थानकावर एकूण ५ फलाट आहे. या प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पादचारी पूल व लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काहीच महिन्यापूर्वी रेल्वे विभागाने फलाट क्रमांक ५ वर पादचारी पूल तयार केला. मात्र हा पूल फारच अरुंद असून बरेचदा पुलावरुन प्रवाशांची कोंडी होत असते. या फलाटावर विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया-बालाघाट, महाराष्टÑ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या थांबतात. विदर्भ एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ही गाडी आल्यानंतर या पुलावर प्रचंड गर्दी होती.त्यामुळे या पुलावरुन रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यास पंधरा ते वीस मिनिटे लागतात.जेव्हा की हे अंतर केवळ पाच ते सात मिनिटाचे आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कधी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. बºयाच प्रवाशांनी ही बाब रेल्वे विभागाच्या लक्षात आणून दिली. मात्र अद्यापही यावर कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे पादचारी पुलाचा धोका कायम आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकावर मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 9:54 PM
पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देगर्दीच्या तुलनेत पादचारी पूल अरुंद : रेल्वे विभागाचे तंत्र चुकले