गोंदिया : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२) जाहीर झाला आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा ९४.१५ टक्के निकाल लागला असून विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९४.१५ टक्के निकाल लागला. जिल्ह्यातील ८१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांनाही चागंली कामगिरी केली आहे. तालुकानिहाय निकालात तिरोडा तालुका ९५.७४ टक्के, सालेकसा ९४.७४ टक्के, सडक अर्जुनी ९४.८७ टक्के, गोरेगाव ९०.४८ टक्के, देवरी ९२.८१ टक्के, अर्जुनी मोरगाव ९४.५४ टक्के, आमगाव ९४.२९ टक्के तर गोंदिया तालुक्याचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याची टक्केवारी ९१.८७ तर विद्यार्थिनींची टक्केवारी ९६.५८ आहे. यावर्षी १८ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १७८८६ परीक्षेला बसले तर १६८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे