शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘पॉस’ अंमलबजावणीत गोंदिया राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:09 PM

स्वस्त धान्य वितरणासंबंधी शिधापत्रिकाधारकांच्या समस्यांचे निराकरण व भ्रष्टाचार दूर करण्यासाठी पार्इंट आॅफ सेल (पीओएस- पॉस) यंत्रणेची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देस्वस्त धान्याचे वितरणअनियमिततेला बसला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्त धान्य वितरणासंबंधी शिधापत्रिकाधारकांच्या समस्यांचे निराकरण व भ्रष्टाचार दूर करण्यासाठी पार्इंट आॅफ सेल (पीओएस- पॉस) यंत्रणेची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक व्हावी, यासाठी ई-प्रणाली अंतर्गत पॉस मशीनद्वारे आधारसंलंग्न वितरण व्यवस्था अंमलात आणण्यात आली आहे. या व्यवस्थेत गोंदिया जिल्ह्याने अतिदुर्गम भागात उत्तम कामगिरी करुन शंभर टक्के वितरण सुरू केले आहे. यामुळेच जिल्हा राज्यात अव्वल ठरला. शंभर टक्के टार्गेट सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्याने पूर्ण केले आहे.गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील जवळपास ७७ गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने ही सुविधा उपलब्ध करुन देत पॉसची अंमलबजावली केली. जिल्ह्यात एकूण ९९८ स्वस्त धान्य दुकान असून मे २०१८ पासून सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीओएस मशिनच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांची ओळख व बोटांचे ठसे जुळवून धान्याचे वितरण केले जात आहे. जिल्ह्यातील ७७ हजार १८१ अंत्योदय शिधापत्रिका, १ लाख २३ हजार ८०४ प्राधान्य गटाच्या शिधापत्रिका मशीनला संलग्न करण्यात आल्या. जून, जुलै, २०१८ मध्ये राज्यात गोंदिया जिल्हा राज्यात वितरण व्यवस्थेत अव्वल ठरला आहे. जुलै २०१८ मध्ये आमगाव तालुक्यात ९६ टक्के, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ८७ टक्के, गोरेगाव ९५ टक्के, सालेकसा ९८ टक्के, देवरी ८८ टक्के, सडक अर्जुनी ८७ टक्के, गोंदिया ७३ टक्के व तिरोडा तालुक्यात ९५ टक्के असे एकूण सरासरी ९० टक्के अन्नधान्य वाटप करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

स्वस्तधान्य दुकानदारांचा सन्मानपॉस मशीनच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्था जिल्ह्यात अंत्यत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५६ स्वस्त धान्य दुकानदारांचा सत्कार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला.

रॉकेल वितरणही पॉसद्वारेकोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी रॉकेल वितरणसुध्दा पॉसद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळेच लवकरच रॉकेल विक्रेत्यांना पॉस मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.अंत्योदय व इतर शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यापासून वंचित राहू नये, वितरण व्यवस्थेतील अनियमितता दूर व्हावी, यासाठी जिल्ह्यात शंभर टक्के पॉस मशिन लावण्यात आल्या आहेत.- अनिल सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :Governmentसरकार