शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

Gondia: जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली, गोरेगाव पोलिसांची कारवाई

By कपिल केकत | Published: November 16, 2023 4:09 PM

Gondia News: जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडले. गोरेगाव पोलिसांनी ठाणा चौक येथे बुधवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजेदरम्यान ही कारवाई केली.

- कपिल केकतगोंदिया - जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडले. गोरेगाव पोलिसांनी ठाणा चौक येथे बुधवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजेदरम्यान ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोन वाहने व ११ जनावरे असा एकूण चार लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैधरीत्या धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे, तसेच सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी सर्व ठाणेदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पोलिसांची अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध धाड मोहीम सुरू आहे. अशात बुधवारी (दि.१५) गोरेगाव पोलिसांनी डायल ११२ वरून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणा चौक येथे सायंकाळी ४ वाजेदरम्यान अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५ के ४०९९ व वाहन क्रमांक एमएच ४० एएफ ६०५८ ला पकडले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात एकूण ११ जनावरे निर्दयीपणे कोंबून व बांधून ठेवल्याचे दिसून आले. यावर पोलिसांनी दोन्ही वाहने किंमत चार लाख रुपये व ५५ हजार रुपये किमतीची जनावरे, असा एकूण चार लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कामगिरी पो.नि. भुसारी यांचे पथक सपोनि. अमोल काळे, पोउपनि सुजित घोलप, सहायक फौजदार यशवंत शहारे, हवालदार अडमाची, लांजेवार, शिपाई कुमडे, केवट, दास, खेकरे यांनी केली आहे.

या तिघा आरोपींवर गुन्हा दाखलया प्रकरणात पोलिसांनी संदेश एकनाथ फुल्लुके (४१, रा. मुरपार, ता. सडक-अर्जुनी), विकास आनंद भोंडे (२६, रा. सातलवाडा, ता. साकोली) व आकाश संजय जगने (३२, रा. आमगाव) यांच्याविरुद्ध गोरेगाव ठाण्यात कलम ११(१) (ड), ११(१), (ई), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० सहकलम ६,९ महा. पशु. संरक्षण अधि.अन्वये गुन्हा नोंद केला आहे, तसेच जनावरांना सुरक्षा व चारापाण्याची सोय व्हावी याकरिता गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी