गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून बुधवारी (दि.१) जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मागील पंधरा दिवसातील हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस शहरातील रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २५ मेपासून नवतपाला सुरुवात झाली असून आणखी दोन-तीन दिवस जिल्हावासीयांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यात दोन-तीन दिवसात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी सध्या वाढत्या उकाड्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण आहेत.