आॅनलाईन लोकमतगोंदिया : मागील दोन तीन दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. मंगळवारी (दि.२८) शहरात १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याच कालावधीतील मागील दहा वर्षांतील हे सर्वात कमी तापमान आहे.शहरातील तापमानात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घट होत असल्याने थंडीत वाढल्याचे शहरवासीय बोलत आहे. सकाळी ९ आणि सायंकाळी ६ वाजतापासूनच थंडीमुळे उणी कपडे घालून नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र शहरात गेल्या मागील दोन तीन दिवसांपासून आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या दैनदिन वेळापत्रकावर सुध्दा बिघडले आहे. इतर शहरांच्या तुलनेत दरवर्षी गोंदिया शहरात थंडीचा जोर अधिक असतो. मागीेल दोन दिवसांपासून शहराचे तापमान १०.५ ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविल्या गेले. त्यानंतर मंगळवारी शहराचे तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. हे गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी तापमान होय. यापूर्वी २९ नोव्हेबर १९९८ ला शहराचे तापमान ८.५ सर्वात कमी नोंदविल्या गेले. तर २० नोव्हेबर २०१६ मध्ये १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी (दि.२८) रोजी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या दशकातील याच कालावधीतील हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. मध्यप्रदेशातील उत्तर-पूर्व भागाकडून वाहणाºया शित वाºयांमुळे गोंदियाच्या तापमानात घट झाली आहे. ही थंडीची लाट पुन्हा दोन तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.मध्यप्रदेशातील उत्तर-पूर्व भागाकडून वाहणाºया थंड वाºयामुळे गोंदिया येथे मंगळवारी (दि.२८) सर्वात कमी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुन्हा दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.- ए.डी.ताटे,प्रादेशिक हवामान संचालक नागपूर.