शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:30 PM

धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहे.

ठळक मुद्देठाकूर बंधुंचा यशस्वी प्रयोग : प्रथमच विदेशी फळांची लागवड, धानाच्या शेतीला पर्याय

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहे. विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी केला आहे.परदेशात पिकणाºया फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते. त्यातच जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यवसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या ४ ते ५ एकर शेतात केला. ते फळ म्हणजे ड्रॅगन फळ होय.थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.मागील तीन चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. धान उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ठाकरे बंधूनी ड्रॅगन फळाची यशस्वी शेती केली आहे.गोंदियापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या रायपूर येथे ठाकरे बंधूची शेती असून त्यांनी चार ते पाच एकरवर ड्रॅगन फळाच्या झाडांची लागवड केली. ड्रॅगन फळ आरोग्यासाठी लाभदायक असून नागपूर, छत्तीसगड व रायपूरच्या बाजारपेठेत या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.अकोला कृषी विद्यापीठातून कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले गोरेगाव तालुक्यातील इसाटोला रहिवासी श्रीराम ठाकूर यांना शेतीच्या क्षेत्रात आधीपासूनच रस आहे. त्यांच्या मुलांनाही शेतीमध्ये आवड निर्माण झाल्याने त्यांनी जैविक शेतीला प्राधान्य देत काम केले. त्यांनी आपल्या शेतात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे.तीन वर्षांपूर्वी केली लागवडठाकूर यांनी आपल्या शेतात २०१५ मध्ये पाच एकर शेतीत ५८०० ड्रॅगन फळाच्या झाडांची लागवड केली. या झाडांना ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दिले. तीन वर्षांनंतर या झाडांना फळे लागण्यास सुरूवात झाली. एक फळ जवळपास ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचे असून एका झाडाला ६ ते ७ फळे लागली आहे. विशेष म्हणजे निघालेली फळे ही ठाकूर बंधू आधी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेट देतात.रक्तपेशी वाढविण्यास मदतछत्तीसगडच्या रायपूर येथील बाजारपेठेत ड्रॅगन फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एका फळाला ६० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. या फळात औषधीयुक्त गुणधर्म असल्यामुळे ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. डेंग्युच्या आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तामधील पेशी वाढवण्याचे काम हे फळ करते. त्यामुळे विदर्भातील पारंपारिक शेतीला ही फळ शेती पर्याय ठरू शकते.व्हिएतनामवरून आणले रोपटेपारंपारिक धानासोबतच बाजारात मागणी असणाºया फळांच्या लागवडीचा विचार केला. त्यासाठी त्यांनी ड्रॅगन फळाचे रोपटे व्हिएतनामवरु न आणले. या फळाच्या झाडाची लागवड करुन त्यातून उत्पादन घेण्याचे मनात ठरवून ठाकूर यांनी आव्हान स्विकारले. थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या ड्रॅगन फळांची यशस्वी शेती करण्यात त्यांना यश आले.विदर्भातील हवामानात उत्पादन घेणे शक्यड्रॅगन फळ पूर्ण पिकल्यानंतर तोडणे अपेक्षीत आहे. या फळाभोवती वेलीचे काटे असल्याने हे फळ कापण्यासाठी विशिष्ठ प्रकारची कात्री वापरली जाते. थायलंड व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशात तयार होणारे हे ड्रॅगन फळ विदर्भातल्या हवामानात घेणे शक्य असल्याचे भालचंद्र ठाकूर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.