शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

गोंदियात तणाव कायम

By admin | Published: June 16, 2015 12:49 AM

सुदर्शन समाजाचे आणि न.प.मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेता छेदीलाल इमलाह यांच्या शनिवारी सायंकाळी झालेल्या...

बाजारपेठेवर परिणाम : दुपारनंतर दुकाने पुन्हा झाली बंदगोंदिया : सुदर्शन समाजाचे आणि न.प.मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेता छेदीलाल इमलाह यांच्या शनिवारी सायंकाळी झालेल्या हत्येनंतर निर्माण झालेली तणावाची स्थिती सोमवारीसुद्धा कायम होती. त्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम कायम होता.सकाळपासूनच दहशतीचे वातावरण कायम असल्यामुळे ९५ टक्के दुकानदारांनी दुकाने उघडण्याची हिंमत केली नाही. काही मोजकीच दुकाने उघडल्या गेली. दुपारी वातावरण निवळल्याचे समजून बऱ्याच दुकानदारांनी दुकाने उघडली. मात्र मात्र वातावरण ठिक नसल्यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे फिरकलेच नाही. दरम्यान सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा काही युवकांनी मार्केट परिसरात आरडाओरड करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक यादव बंधूंना अटक केल्याचीही अफवा काही लोकांनी पसरविली. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही. शहराच्या अनेक भागात सोमवारीही दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. मात्र जनजीवन सामान्य करण्यात पोलीस प्रशासनाला अजून यश आलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)अफवांमुळे दहशतगोंदिया शहरात आणखी एक हत्या झाल्याची अफवा सकाळपासून पसरविली जात होती. त्यामुळे गोंदिया शहरातील बाजारपेठेत सकाळपासून अनेक दुकाने उघडलीच नाही. काही व्यापाऱ्यांनी अर्धवट दुकाने उघडली. दुपारी माहौल शांत झाल्याचे वाटल्याने बहुतांश दुकाने उघडली. मात्र सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा यादव बंधूंना अटक झाल्याची अफवा पसरवित काही युवकांनी मार्केट परिसरात हुल्लडबाजी केली. त्यामुळे पुन्हा सर्व दुकाने पटापट बंद करण्यात आली.