शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात गोंदिया राहणार प्रथम

By admin | Published: February 15, 2016 1:52 AM

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

मार्चअखेर १०० टक्के शाळा : अप्रगत विद्यार्थ्यांना करणार प्रगत, ९९५ शाळांत ज्ञान रचनावाद उपक्रम नरेश रहिले गोंदियाप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रगत महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून नावारूपास गोंदियाला आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४९ पैकी ९९५ शाळा ज्ञान रचनावादचे शिक्षण देत आहेत. फक्त पाच टक्के शाळा लवकरच या ज्ञान रचनावादात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी दिली आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा माणस बांधला आहे. या उपक्रमाला कृतीत उतरवून राज्यात प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी नरड यांनी २०० शाळा दत्तक घेऊन तसेच गटशिक्षणाधिकारी व अधिनस्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रुख यांना दत्तक घेण्यास भाग पाडून त्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला आहे. या शाळांतील प्रत्येक बालक ज्ञानरचनावादी पध्दतीने शिकावे, अशी अपेक्षा आहे. लेखन, वाचन व गणित क्रिया बालकांंना प्राप्त करणे आवश्यक आहे. बालकांचा बहुमुखी विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांगी बदल करण्यात आले आहे. प्रत्येक शाळा सुंदर व समाजाभिमुख करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. मनोरम्य वातावरणात बालकांचे अध्ययन व्हावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले. सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शाळेत शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मुलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीशी करणे, शाळा सुंदर व बोलक्या करणे, विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जाणार आहेत.