गोंदिया : जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असून बाधितांची संख्या नियंत्रणात असून क्रियाशील रुग्णसंख्येतही झपाट्याने घट होत आहे. अशात जिल्हावासीयांसाठी गुड न्यूड असून तिरोडा व देवरी तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. मात्र सर्वच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हावासीयांनी संयम पाळणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बाधितांची संख्या ४०००० पार गेली आहे. तर क्रियाशील रुग्णांची संख्या ४०४०५ झाली असून यावरून कोरोनाचा कहर अनुभवता येतो. दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान कधीही भरण्यासारखे नसून ते दिवस न आठवलेलेच भले असे वाटते. मात्र आता ते कठीण दिवस निवळत असून दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. यामुळे आता बाधितांची संख्या नियंत्रणात आली असून जिल्ह्यात ४७ क्रियाशील रुग्ण उरले आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, तिरोडा व देवरी तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. तिरोडा तालुका ३० जूनपासून कोरोनामुक्त झाला असून देवरी तालुका १ जूनपासून कोरोनामुक्त झाला आहे. शिवाय अन्य तालुक्यांतही आता मोजकेच रुग्ण उरले आहेत. यामुळे जिल्हा आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसून येत आहे. मात्र यासाठी नागरिकांचे सहकार्य व त्यांच्या संयमाची तेवढीच गरज आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १ बाधित आढळून आल्याने हा तालुका कोरोनामुक्त झाल्यानंतर आता पु्न्हा बाधित तालुक्यांच्या यादीत आला आहे. यामुळे खरबदारी घेणे आजही तेवढेच गरजेचे आहे.
----------------------------------
तिरोड्यातील परिस्थिती नियंत्रणात
तिरोडा मागील ३ दिवसांपासून कोरोनामुक्त असल्याने तेथील परिस्थिती नियंत्रणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासून तिरोडा तालुका जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट होता. मात्र कोरोनाशी लढ्यात तालुकावासीयांनी दिलेली साथ हेच तालुका कोरोनामुक्त झाल्याचे महत्त्वपूर्ण कारण आहे.
------------------------
बाधितांची संख्या वाढल्याने टेन्शन
जिल्हयातील परिस्थिती नियंत्रणात असून २ तालुका कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र मागील २ दिवसांपासून बाधितांची संख्या वाढली असून शिवाय कोरोनामुक्त झालेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पु्न्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने टेन्शन वाढले आहे. परिणामी नागरिकांनी सावधानी बाळगणे आता अधिक गरजेचे झाले आहे.
------------------------------
तालुकानिहाय क्रियाशील रुग्णांचा तक्ता
तालुका रुग्ण
गोंदिया १२
तिरोडा ००
गोरेगाव ०५
आमगाव ०७
सालेकसा १९
देवरी ००
सडक-अर्जुनी ०१
अर्जुनी-मोरगाव ०१
इतर राज्य-जिल्हा ०२
एकूण ४७