लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे देश आणि राज्यावर मोठे संकट आले आहे.शासन आणि प्रशासन याविरुध्द सक्षमपणे लढा देत आहे. कोरोनाविरुध्दचा अधिक तीव्रपणे लढता यावा यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान सहायता निधी जमा केली आहे.सदर निधी त्यांनी १३ एप्रिलला जमा केला आहे.कोरोनामुळे देश आणि राज्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे. लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार, उद्योग धंदे, रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प आहेत.त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. देशात निर्माण झालेल्या संकटाशी सरकार आणि प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र हा लढा अधिक सक्षमपणे लढता यावा,यासाठी आपण सर्वांनी आपले सामाजिक दायित्त्व ओळखून त्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्याची गरज आहे.याच दृष्टीकोनात आपण ही मदत केल्याचे माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले. विशेष म्हणजे त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील गरजू कुटुंबांवर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी अन्नधान्याचे वाटप सुरू केले आहे. यातंर्गत आत्तापर्यंत ७५०० गरीब कुटुंबांपर्यंत पोहचून त्यांना अन्नधान्याचे वाटप केले आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोनाला हरविण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान सहायता निधीस गोपालदास अग्रवाल यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:00 AM
लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार, उद्योग धंदे, रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प आहेत.त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. देशात निर्माण झालेल्या संकटाशी सरकार आणि प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र हा लढा अधिक सक्षमपणे लढता यावा,यासाठी आपण सर्वांनी आपले सामाजिक दायित्त्व ओळखून त्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
ठळक मुद्दे३ लाख रुपयांचा निधी केला जमा : कोरोनाविरुद्ध लढा