लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन दीनदुबळ्यांसाठी अविरत संघर्ष करीत राष्ट्रीयस्तरावर विविध पदे भुषवून तत्त्वनिष्ठ राजकारण करीत सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. शेतकरी असो, ऊस तोडणारे कामगार असो की एखादा सामान्य मजूर असो प्रत्येकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे कार्य लोकनेते गोपीनाथ मुंडे केले. भ्रष्टाचार मुक्त वातावरणात समाजाला न्याय कसा मिळवून देता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे होते, असे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.वंजारी समाज कर्मचारी समितीच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीचे औचित्य साधून मंगल्म मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय दप्तराचे वाटप करण्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, प्राचार्य शुक्ला उपस्थित होते. याप्रसंगी बरकते यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेकदा सेवेनिमित्त राहण्याचा योग आला. त्यांच्या विचारांनी आपण प्रभावित असल्याचे सांगीतले. यावेळी बसवराज केसाळे, लक्ष्मण आंधळे, अशोक चेपटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष नारायण शिरसाट यांनी केले. संचालन शिवाजीराव बडे तर आभार सचिव बापूराव दराडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी दत्ता लहाने, एम.डी. फड, आर.बी. मुंडे, गंगाधर केंद्रे, गणेश सानप, सूर्यकांत केंद्रे, विशाल तोंडे, नामदेव कातकडे, बालाजी डिगोळे, लिंबाजी कुटे, विठ्ठल केंद्रे, युवराज बडे, दयानंद चाटे, विजय मुरकुटे, भाऊसाहेब केंद्रे, सुसेन वनवे, भाऊसाहेब शिरसाट, अशोक केंद्रे, त्रिंबक जायभाये, चंद्रकात गुट्टे, बलवंत कुटे, मामा मुंढे, चंद्रकांत हेमके, गोपीनाथ ठुले, अशोक गर्जे, उत्तम भताने, हरी दराडे, तुकाराम केदार, मारोती मुंडे, सांगळे व समाजबांधवांनी सहकार्य केले.
गोपीनाथ मुंडे हे शेतकरी व जनसामान्यांचे नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 9:12 PM
अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन दीनदुबळ्यांसाठी अविरत संघर्ष करीत राष्ट्रीयस्तरावर विविध पदे भुषवून तत्त्वनिष्ठ राजकारण करीत सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले.
ठळक मुद्देविनोद अग्रवाल : मंगलम मूकबधीर विद्यालयात कार्यक्रम