लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिकांचा गोरेगाव मंथन, जय महाकाल निसर्ग मंडळ ग्रुप सामाजिक उपक्रमात सहभागात युवक आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक उपक्रम असो वा कामाचे नियोजन असो सर्व सदस्य सक्रिय होवून ते काम हाती घेऊन तडीस नेतात.त्यांच्या उपक्रमात खुद्द नगर पंचायत प्रशासनही मदतीस उतरत आहे हे विशेष.मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्यक्षात सामाजिक उपक्रमात सक्रिय झालेला गोरेगाव मंथन, जय महकाल व निसर्ग मंडळ, व्हॉटसअप ग्रुपने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. सर्वप्रथम गोरेगाव मंथन ग्रुपच्या काही सदस्यांनी, युवा स्पोर्टस क्लब व गायत्री परिवाराला सोबत घेऊन तब्बल ३६ आठवडे श्रमदान करुन पवन तलावाच्या कायापालट केला. सध्या या भागात गावकरी व्यायामासाठी येतात, स्थानिक जयमहाकाल ग्रुपने पोलीस स्टेशन वसाहतीत चार दिवस स्वच्छता अभियान राबवून सामाजिक कार्याला हातभार लावला. निसर्ग मंडळ ग्रुपने निसर्ग, प्राण्याप्रती, स्वच्छता अभियानात मोलाची भूमिका बजावली. व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून एकीकडे सामाजिक चळवळ तयार होत असताना या साऱ्या कार्याकडे लक्ष देत येथील नगरपंचायत हातभार लावायला विसरले नाही. पोलीस वसाहतीत जय महाकाल ग्रुपच्या स्वच्छता अभियानात नगरपंचायतची भूमिका सुध्दा महत्त्वाची होती.ज्या समाजात जगलो, वावरलो त्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावनाच सर्वांना सामाजिक चळवळीत उतरायला भाग पाडत आहे.गोरेगाव शहराच्या विकासासोबतच सर्वाचे तारतम्य महत्त्वाचे आहे. सर्व एकदिलाने कामे करीत असल्यामुळे श्रमदानातून बरीच विकासाची कामे केली जात आहे. ही बाब सर्वांच्या ध्यानीमनी आहे.या तिन्ही ग्रुपचे विशिष्ट आवडीनिवडीचे सदस्य आहेत. शेतकऱ्यांपासून ते राजकारणी, निसर्गप्रेमी, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यीक, शासकीय कर्मचारी, कवी, पत्रकार, शिक्षण घेणारी मुले, व्यावसायीक या लोकांचा भरणा आहे.त्यामुळे सामाजिक चळवळ उभी करताना वा कुणी सामाजिक काम म्हणून श्रमदान करीत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे, मदत करणे हे काम या ग्रुपचे नित्याचेच झाले आहे.गोरेगाव मंथन व्हॉटस्अॅप ग्रुप केवळ मनोरंजना पुरता मर्यादित नाही. या ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे या ग्रुपचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.-टिटू जैने, शेतकरीगोरेगाव मंथन ग्रुपवर बरेच लोक जुडलेले आहेत. त्या सर्वांकडे सामाजिक प्रश्न सोडविण्याची जिद्द आहे. त्यामुळे श्रमदानातून सामाजिक ज्वलंत प्रश्नाला हात लावला जात आहे.- विकास बारेवार, सामाजिक कार्यकर्ता.
‘गोरेगाव मंथन ग्रुपने’ घेतला सामाजिक कार्याचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:19 PM
शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिकांचा गोरेगाव मंथन, जय महाकाल निसर्ग मंडळ ग्रुप सामाजिक उपक्रमात सहभागात युवक आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक उपक्रम असो वा कामाचे नियोजन असो सर्व सदस्य सक्रिय होवून ते काम हाती घेऊन तडीस नेतात.
ठळक मुद्देसंडे अँकर । श्रमदानातून परिसराचा कायापालट : युवकांसह नागरिकांचा सहभाग