राजकुमार बडोले : शिवार सभांमधून ग्रामस्थांशी हितगूज लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : शेतामध्ये जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात व्हाव्या यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदणे, जलशिवाराच्या माध्यमातून पाण्याचा संचित साठा वाढविण्यात येत आहे. एकंदरीत मागील अडीच-तीन वर्षामध्ये सरकारने राबविलेल्या लोकोपयोगी योजनामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा निश्चित हित जोपासला जाणार असा आशावाद राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनांतर्गत भाजपा सरकारने केलेल्या कामाची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी शिवार सभांच्या माध्यमातून इंझोरी, निमगाव येथील ग्रामस्थांशी हितगूज साधतांना बडोले बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावातील शेवटच्या टोकावरील गरजू लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही. गावखेड्यातील गरिबातला गरीब व्यक्ती विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना विस्ताराने गावपातळीवरील सामान्य माणसाच्या दारापर्यंत जाण्यासाठी शर्र्तीेचे प्रयत्न केल्या जात आहे. शेतामध्ये काबाडकष्ट करणारा शेतकरी सशक्त होऊन कर्जपाशातून मुक्त होण्यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मदतीची साथ देत आहे. गावामध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. इंझोरी येथील भाजपाचे महासचिव लायकराम भेंडारकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाप्रसंगी ना. राजकुमार बडोले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचना गहाणे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे, विनोद नाकाडे, तालुका भाजपाध्यक्ष उमाकांत ढेंगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, माजी भाजपाध्यक्ष चत्रूभाऊ भेंडारकर, होमराज ठाकरे, खरेदी-विक्री समितीचे उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संदीप कापगते, डॉ. ब्राम्हणकर यांची उपस्थिती होती. पुढे बडोले म्हणाले, अडीच वर्षाच्या काळात राज्य शासनाने विविध लोकोपयोगी कामे केली आहेत. राज्यातील शेतकरी नागवला जाऊ नये म्हणून वेळोवेळी शासनाने मदत केली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल पिकविण्यासाठी आवश्यक असणारे रासायनिक खतांचा काळाबाजार होऊ नये, त्यात शेतकरी लुबाडला जाऊ नये म्हणून काळाबाजार करणाऱ्या खत विक्रेत्यांवर लगाम लावली. शेतकऱ्यांनी पिकविलेला धान हमी भावानी विकला जावा म्हणून सर्वत्र शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करुन त्यांच्या खात्यामध्ये आॅनलाईनद्वारा रक्कम जमा करण्याची प्रणाली अंगीकारली गेली. शेतमालाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदतीचे तंत्र अंगीकारले आहे. गावामध्ये पायाभूत सुविधा पोहोचण्याच्या प्रयत्न केला जात आहे. बेरोजगार युवकांना कामाची व रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगीतले. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करताना धुराचा त्रास होऊ नये म्हणून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत सामान्य माणसाच्या घरी गॅसचूल आज पेटताना दिसत आहे. गावखेडे मुख्य गावाशी जोडले जावे म्हणून सर्वत्र मजबुत रस्ते निर्माण करण्यात आले. गावात बससेवा आली. विजेचा पुरवठा सर्वत्र होत आहे. या सरकारची नाळ ग्रामीण जनतेशी जुडली असल्याने गावातील शेवटचा माणूस वंचित राहणार नाही. याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. विरोधकांचा समाचार घेतानी बडोले म्हणाले की विरोधक आज कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरले. परंतु गेली १५ वर्ष सत्तेत असतानी फक्त एकदाच कर्जमुक्ती केली. त्यानंतर त्यांना शेतकऱ्यांची दैनावस्था दिसलीच नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपा सरकारने अडीच वर्षात ४० हजार कोटीची गुंतवणूक केली. ११ हजार ९५ कोटीची शेतकऱ्यांना रोख मदत केली. पीक विम्याखाली ६० लाखाचे वाटप, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ११ हजार ४९२ गावात ४ हजार १७८ कोटी खर्च करुन पाण्याच्या संचित साठ्यात वाढ केली. गाळमुक्त तलाव, गाळमुक्त शिवार योजना राबवून ३ सिंचन क्षमता वाढविली गेली. मागेल त्याला शेततळीमध्ये २७ हजार शेततळी पूर्ण केले. २ लाख ७५ हजार शेतीपंपाला वीज जोडणी करण्यात आली. राशनचा काळाबाजर होऊ नये गरजू अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही म्हणून धान्य दुकाने आॅनलाईन करण्यात येत आहेत. गरजूंना घरे दिले जात आहेत. लोकहितार्थ योजना राबविल्या जात आहेत.
शासन शेतकऱ्यांचे हित जोपासते
By admin | Published: June 07, 2017 12:20 AM