लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा काँग्रेस महासचिव व आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले.नजीकच्या मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ मुंडीपार सालेकसाच्या वतीने मुंडीपार येथे तीन दिवसीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जि.प. प्राथमिक शाळा मुंडीपार येथील पटांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स. सभापती यादनलाल बनोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य विजयकुमार टेकाम, पं.स. सदस्या अर्चना राऊत, मुंडीपारचे सरपंच किरण वाघमारे, माजी सरपंच घनशाम नागपुरे, बलीराम बसोने, राधेशाम नागपुरे, खेमचंद उपराडे, राजगिरे, दमाहे, ढेकवार व अमरचंद जमदाळ, कोरे, कुंभरे, बल्हारे, येसनसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.तीन दिवसीय प्रौढ कबड्डीच्या प्रथम विजेत्या संघाला दहा हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार असून, द्वितीय सहा हजार एक, तृतीय ४००१ आणि चौथे बक्षीस २००१ रुपये ठेवण्यात आले आहे. तृतीय बक्षीस सहेसराम कोरोटे यांच्याकडून ठेवण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शनात वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागात राहणाºया युवकांना रोजगार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर युवक आपले घरदार सोडून शहराकडे जातात व मोलमजुरी करुन जीवन जगत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व कौशल्याप्रमाणे रोजगाराची संधी मिळाल्यास त्याच्या कुटुंबांना मोठी आर्थिक मदत होईल. परंतु शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची देखील सरकारला आता विसर पडला आहे. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याची टिका केली.बनोटे यांनी क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूंचा सर्वांगिन विकास होत असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धांचे नियमित आयोजन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश वाघमारे, सुकदास लिल्हारे, ईश्वर नागपुरे, भोजराज चौडाये, राजकुमार वाघमारे, गेंदलाल जमदाड, महेश उपराडे, कैलास मेश्राम, खेमराज किरसान, राजकुमार बसोने, कुंवर वाघमारे, मदन वाढई, भागीरथ नागपुरे, रमेश लिल्हारे, अनिल नागपुरे, चंद्रप्रकाश नोटे, सुनील नागपुरे, छोटू लिल्हारे यांनी सहकार्य केले.
युवकांना रोजगार देण्यात शासनाला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 9:44 PM
मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे.
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन