कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा पशू संवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून यामुळे मात्र पशू पालक अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात श्रेणी-१ चे ४२ दवाखाने असून येथील पशू धन विकास अधिकाऱ्यांची २६ पदे रिक्त पडून आहेत. अशात मात्र या दवाखान्यांचा कारभार किती सुरळीत पणे चालत असेल याची प्रचिती येते. यावरून मात्र सरकारला पशू संवर्धन विभागाचा विसर पडल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.एकीक डे सरकार शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पशू पालनाचे मंत्र देत असून विविध योजना राबवित आहे. मात्र पशू धनाच्या आरोग्याची काळजी घेणारेच राहणार नाही तर पशुंची देखभाल करायची कशी याचे उत्तर देत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात पशू संवर्धन विभागाचे १०३ पशू वैद्यकीय दवाखाने आहेत. यातील ७२ दवाखाने जिल्हा परिषदेचे तर ३१ दवाखाने राज्याचे आहेत.या दवाखान्यांतील ४२ दवाखाने श्रेणी-१ चे असून तेथे पशूधन विकास अधिकारी (वर्ग-१) बसतात. मात्र जिल्ह्यातील शोकांतीका अशी की यातील दवाखान्यांतील पशूधन विकास अधिकाºयांच्या खुर्च्या रिकाम्या पडून आहेत. रिक्त पडून असलेल्या या खुर्च्यांवरील काही अधिकारी सेवानिवृत्त झाले, तर काही सुटीवर असून काही पद भरण्यात आलेलेच नाहीत.यामुळे मात्र कार्यरत असलेल्या १६ अधिकाºयांना अतिरीक्त प्रभार देऊन या दवाखान्यांचा कारभार चालविला जात आहे. मात्र अशात कारभार किती सुरळीतपणे चालणार हे सांगायची गरज नाही.जिल्ह्यातील ही स्थिती बघता सरकारला गोंदिया जिल्ह्यातील पशूधन संवर्धन विभागाचा विसर पडला असावा असे आता विभागातच बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त पडून असतानाच जिल्ह्यातील गोधन किती सुरक्षीत आहे हे यातून दिसून येते. शिवाय रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकाºयांची गोची होत आहे.अतिरीक्त प्रभारामुळे या अधिकाºयांनाही येथून तिथे फिरावे लागत असल्याची स्थिती आहे. अशात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याएवढा सक्षम नसलेला गरीब शेतकरी कुणाच्या भरवशावर पशू धन ठेवणार हा प्रश्न उपस्थित होतो.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकही अधिकारी नाहीअर्जुनी मोरगाव तालुक्यात श्रेणी-१ चे ५ दवाखाने आहेत. म्हणजेच येथे ५ पशू धन विकास अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव तालुक्याची शोकांतीका अशी की येथील पशूधन विकास अधिकाºयांचे ५ ही पद रिक्त पडून आहेत. असेच काहीसे हाल सर्वच तालुक्यांचे आहेत. या तालुक्यांतही मंजूर पदांच्या अर्ध्याधीक पदे रिक्त पडून आहेत. यावरून शासन किती गंभीर आहे हे दिसून येते.
सरकारला पशू संवर्धन विभागाचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 9:30 PM
जिल्हा पशू संवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून यामुळे मात्र पशू पालक अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात श्रेणी-१ चे ४२ दवाखाने असून येथील पशू धन विकास अधिकाऱ्यांची २६ पदे रिक्त पडून आहेत. अशात मात्र या दवाखान्यांचा कारभार किती सुरळीत पणे चालत असेल याची प्रचिती येते.
ठळक मुद्देनिम्म्याहून अधिक पदे रिक्त : २६ पशूधन विकास अधिकारी नाहीत