लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जनतेने निवडून दिलेल्या सरकाराने संविधानानुरुप कार्य करुन जनतेप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.सालेकसा तालुक्याच्या पिपरीया येथे रजत जयंती समारोह प्रसंगी ते बोलत होते. अंबिका बहुउद्देशिय शिक्षण संस्था सालेकसाच्यावतीने पिपरीया येथील कचारगड आदिवासी आश्रमशाळेत रजत जयंती कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जि.प.चे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. सहषराम कोरोटे, माजी मंत्री भरत बहेकार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य विजय टेकाम, पं.स.सभापती अर्चना राऊत, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी उपस्थित होते.या वेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि आ. सहषराम कोरोटे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्षाच्यां हस्ते संस्थेच्या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्व.नारायण बहेकार यांच्या स्मृती निमित्त प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या रजत पदक देऊन गौरवान्वित करण्यात आले. यात अश्विनी रहांगडाले, निशा कुराहे, पुष्पा कुराहे, प्रियांशी तुरकर, नेहा पटले, योगेंद्र पंधरे, लेखा बरैया या विद्यार्थ्यांचा समावेश होता.तसेच संस्थेत २५ वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.यामध्ये मुख्याध्यापक आर.जी.दोनोडे, एस.आर.रामरामे, व्ही.एस.चुटे, आर.के.दसरीया, टी. एस. कटरे, बी.बी. नहाके, टी.डी.किरसान यांचा समावेश होता. पटोले म्हणाले देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानंतरही आदिवासी समाज विकासच्या प्रवाहात आला नाही.आताही त्यांना संविधानानुसार हक्क मिळत नाही ही चिंतेची बाब आहे. अशात शासनाने आदिवासी क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची गरज. विधानसभेत ठराव पारीत करुन आरक्षण पुन्हा १० वर्ष वाढविण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात आली.आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आवश्यक पाऊल महाराष्टÑ शासनाने उचलावे यासाठी शासनाला वारंवार प्रेरित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्यांचा उल्लेख केला आहे. त्यानुसार प्रत्येक नागरिकाला हक्क मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजू दोनोडे यांनी मांडून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी संस्थाध्यक्ष सावलराम बहेकार, सचिव यादनलाल बनोठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.ओबीसी आंदोलन तीव्र करण्याची गरजयावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसींना आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.शासनाच्या योजना व सुविधाचा लाभ वर्गनिहाय प्रमाणात झाला पाहिजे.यासाठी जनगणनेच्या कामात ओबीसीची सुद्धा जनगणना होणे आवश्यक आहे.
सरकारने संविधानाच्या अनुरुप कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:00 AM
सालेकसा तालुक्याच्या पिपरीया येथे रजत जयंती समारोह प्रसंगी ते बोलत होते. अंबिका बहुउद्देशिय शिक्षण संस्था सालेकसाच्यावतीने पिपरीया येथील कचारगड आदिवासी आश्रमशाळेत रजत जयंती कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जि.प.चे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार होते.
ठळक मुद्देनाना पटोले : पिपरीया येथे जयंती समारोह, गुणवंतांचा सत्कार