लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे.मागील सरकारचे पाप नष्ट करुन गाव पातळीवरील समस्त शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सध्यास्थित होत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खोळदा, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड बाजार समितीचे उपबाजार नवेगावबांध येथील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते विविधत काटापूजन करुन धान खरेदी सुरु करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीफ जमा कुरैशी, खरेदी विक्री समितीचे सभापती नामदेव कापगते, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, खरेदी-विक्री समितीचे उपसभापती केवळराम पुस्तोडे, तालुका भाजपाध्यक्ष उमाकांत ढेंगे, तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, शिवनारायण पालीवाल, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे,पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, तहसीलदार धनंजय देशमुख उपस्थित होते.बडोले म्हणाले शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानाला योग्य भाव मिळावा म्हणून जिल्ह्यात सर्वत्र शेतकºयांचा समावेश असलेल्या सहकारी संस्थामार्फत शासकीय आधारभूत हमी भाव धान केंद्र सुरु करण्यात आले.दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवात शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळत राहावा म्हणून ठिकठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील सहकारी संस्था आर्थिक सक्षम होण्यासाठी सब एजंट म्हणून धान खरेदी केंद्र सहकारी संस्थांना दिले आहेत.देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणारे शेतकरीबांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करुन शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपक्रम राबवित आहे. शेतकºयांचे सर्वागिण हित डोळ्यासमोर ठेवून सरकार काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासाणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:25 AM
देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : धान खरेदीकेंद्राचे उद्घाटन