शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

हे सरकार विश्वासघाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 9:50 PM

केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने गोर गरीब शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघात केला आहे. वाढती, महागाई, बेरोजगारी या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. केवळ विकास कामांच्या नावाखाली भूमिपूजन केले जात आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने गोर गरीब शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघात केला आहे. वाढती, महागाई, बेरोजगारी या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. केवळ विकास कामांच्या नावाखाली भूमिपूजन केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात विकास कोसो दूर आहे. रस्ते तयार करण्यासाठी व खड्डे बुजविण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण, रस्ते सोडा साधे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याची टीका राष्टÑवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी येथे केली.तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सडक-अर्जुनी येथील त्रिवेणी हायस्कूलच्या पटागंणावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, जि.प.सदस्य रमेश ताराम, किसान सभा अध्यक्ष एम. आर. टी. शहा, जीवनलाल लंजे, माजी पं.स.सभापती वंदना डोंगरवार, देवचंद तरोणे, माजी जि.प. सदस्य नरेश भेंडारकर, मिलन राऊत, माजी नगराध्यक्ष शिव शर्मा, महिला आघाडी अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, रजनी गिऱ्हेपुंजे, जि.प. सदस्य कैलास पटले, माजी नगराध्यक्ष गिता लांजेवार, माजी जि.प. सदस्य प्रभुदयाल लोहिया, शिवाजी गहाणे, छाया चव्हाण, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, दिनेश कोरे, उमराव मांढरे, सुखदेव कोरे, ईश्वर कोरे उपस्थित होते.ना.पटले म्हणाले, यंदा गोंदिया जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर शेती पावसाअभावी पडीक राहिली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. ज्या शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली त्यांना २५ हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी. सरकारने धानाला प्रती क्विंटल २०० बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप पटेल यांनी केला. राज्य व केंद्रातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: केली नसून हे सरकार शेतकरी विरोधी व फसवे असल्याचा आरोप केला. चंद्रीकापुरे म्हणाले, शेतकºयांच्या समस्या फार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी आमच्यासोबत शेतकºयांनी मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन केले. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खा. प्रफुल पटेल यांनी सभा घेण्यासाठी पाच दिवस वेळ देण्याची मागणी केली. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अविनाश काशिवार यांनी केले तर आभार छाया चव्हाण यांनी मानले.कार्यकर्त्यांमध्ये भरला जोशखा.प्रफुल्ल पटेल यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मुद्दावरुन सरकारवर कडाकडून टिका केली. या फसव्या सरकाला धडा शिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार व्हावे. गावा गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्या सोडणविण्याचे आवाहन केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र होते.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल