इतवारी-रिवा रेल्वे गाडीला तिरोडा स्थानकावर थांबा द्या
तिरोडा : हावडा-मुंबई मार्गावरील तिरोडा रेल्वे स्थानकावर इतवारी-रिवा या रेल्वे गाडीला थांबा देण्याची मागणी तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे व्यवस्थापकाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने रेल्वे विभागाने हळूहळू गाड्या सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी इतवारी ते रिवा ट्रेन सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, या गाडीला तिरोडा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही गाडी या तालुक्यातील नागरिकांसाठी गोंदियाल तसेच नागपूर जाण्यासाठी सुविधाजनक आहे. मात्र, थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्य लागून असल्याने आणि सर्वांत मोठा विद्युत प्रकल्प तिरोड्यात असल्याने येथे विविध ठिकाणांहून नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता ही गाडी सुरू करावी.