लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच मतपत्रिका देऊन मताधिकार दिला जातो. तसेच निवडणूक संपताच त्यांनी केलेल्या कार्याचा मोबदलासुद्धा दिला जातो. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असे होत नाही. निवडणुकीच्या सेवेत जे कर्मचारी असतात त्यांची मते संबंधित ग्रा.पं.मध्ये असल्यावर त्यांना वेळेवर मतपत्रिका देऊन आपला मताधिकार वापरण्याचा हक्क असतो. पण ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये यापासून त्यांना वंचित ठेवल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निधी नसल्याचे सांगितले. मताधिकाराबद्दल योग्य ती कारणे दिली नाही. यावरून असे स्पष्ट होत आहे की, निवडणूक यंत्रणा लोकसभा-विधानसभा निवडणुकीला महत्त्व देते पण महत्त्वाच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीला महत्त्व देत नाही. म्हणून मताधिकार व मोबदल्यापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
ग्रा.पं. निवडणुकीची काम करणारे कर्मचारी मताधिकारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:55 AM