गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक)चे १२वे राज्य अधिवेशन गोंदियात घेण्यात येणार आहे. ११ व १२ डिसेंबरला होणाऱ्या अधिवेशनासाठी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची जिल्हाध्यक्ष चत्रुघन लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन वित्तमंत्री यांना दिले जाणार आहे.
सभेत राज्य संघटन सचिव मिलिंद गणविर यांनी राज्य अधिवेशनाच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले. या अधिवेशनाला आयटकच्या राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर(नवी दिल्ली) येतील. विष्णू हत्तीमारे यांच्या मुख्य संयोजकत्वात भोजन समिती, राजेश भोकासे यांच्या मुख्य संयोजकत्वात सजावट समिती, दीप्ती राणे व सुनीता ठाकरे महिला समिती, महेंद्र कटरे यांच्या संयोजकत्वात व्यवस्था करण्यात येईल. यावेळी सुखदेव शहारे व आशिष उरकुडे यांनी राज्य कार्यकारिणीचे अहवाल मांडले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडचणी व यासाठी नवीन सुधारित किमान वेतनावर सरकारद्वारे शंभर टक्के अनुदान देणे, यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे, महासंघाच्या राज्यभर चाललेल्या मोहीम व मंत्रालयात चाललेल्या चर्चेची माहिती दिली. १६ सप्टेंबरला राज्याच्या वितमंत्र्यांना कृती समितीतर्फे मुंबईत निवेदन देण्याचे ठरले. सभेत रवींद्र किटे, महेंद्र भोयर, विनोद, बुधराम बोपचे, खोजराम दरवडे, विनोद शहारे, धनेश्वर जमईवार, उत्तम डोंगरे, नीलेश मस्के, रमेश प्रधान, मुकेश कापगते, खुशाल बनकर, सुनील लिल्हारे, किशोर नागपुरे, माणिक शहारे, मंगला बिसेन, दिनेश झोड, माणिक ऊके, सोमेश्वर राऊत, राधेश्याम ऊके, श्याम कटरे, मुरलीधर पटले, देवेंद्र मेश्राम, जगदीश ठाकरे उपस्थित होते.