शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
5
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
6
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
7
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
8
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
9
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
10
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
11
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
12
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
13
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
14
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
15
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
16
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
17
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
18
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
19
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
20
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 

ग्रा.पं.कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:34 AM

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संघटनेची बैठक पार पडली. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

ठळक मुद्देसंघटनेशी चर्चा : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संघटनेची बैठक पार पडली. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.१८ जानेवारी रोजी मुंबई येथे सह्यांद्री अतिथीगृहात नामदार मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची बैठक झाली. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास विभागाचे उपसचिव मंदार वैद्य, उपसचिव विजय भोसले, सामान्य प्रशासनाचे संजय बनकर, उपसचिव गिरीष भालेराव, कांबळे, यादव, अर्थ- वित्त व नियोजन विभागाचे सर्व उपसचिव तसेच अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने संबंधित विभागाला दिलेल्या मुदतीत अहवाल विनाविलंब सादर करण्याचे आदेश देण्यात आले. समितीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी व पेंशन देण्याबाबत समितीचा अहवाल प्राप्त होताच परळी येथे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अधिवेशन घेण्याचे आश्वासन नामदार मुंडे यांनी दिले. यावेळी राज्य युनियनचे विलास कुमलवार, राज्य उपाध्यक्ष सपना गावंडे, मराठवाडा अध्यक्ष दयानंद साहू, राज्य सरचिटणीस गिरीषा दाभाडकर, दिलीप डिके, कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काजी, भाऊसाहेब ढोकणे, गोंदिया जिल्हाध्यक्ष धनराज तुमसरे तसेच २१ जिल्ह्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.परळी येथे होणाऱ्या अधिवेशनात नामदार मुंडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी व पेंशन जाहीर करणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी मोठ्या संख्येत हजर रहावे असे, राज्य सरचिटणीस गिरीष दाभाळकर, जिल्हा सचिव छगनलाल अग्रेल, मुन्ना मेश्राम, सुनील भेलावे, धर्मराज काळसर्पे, नरेंद्र टेंभुरकर, माधव सेऊतकर, मोहन देसाई, द्वारकाप्रसाद कुंभलवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.मांडोदेवी येथे संघटनेची सभारविवारी (दि.४) गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान बघेडा (तेढा) येथे सकाळी १०.३० वाजता राज्य सरचिटणीस गिरीष दाभाडकर, राज्य उपाध्यक्ष सपना गावंडे, अशोक कुथे व जिल्हाध्यक्ष जयदेव अंबुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेची सभा आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित रहावे असे संघटनेचे जिल्हा सचिव अग्रेल यांनी कळविले आहे.