सडक-अर्जुनी : पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवारी (दि.६) अनाथ, दिव्यांग, एकल परिवारातील कुटुंब छत्र हरवलेल्या माता-भगिनींना वर्षभराचे धान्य देण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल यांचे प्रतिनिधी रोहित अग्रवाल, प्रा.डॉ. सविता बेदरकर, मुख्याध्यापक अनिल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता सीमा डोये, डॉ. छाया लंजे, भरत क्षत्रिय, दिव्या भगत, आरती चवारे, टेमनीचे उपसरपंच शिवलाल नेवारे, नानन बिसेन उपस्थित होते. याप्रसंगी अग्रवाल यांनी, मानव सेवा हीच सगळ्यात मोठी सेवा आहे. ही सेवा करणारे अजरामर झाले. रंजल्या-गांजल्यांचे दु:ख कमी करून त्यांचे अश्रू पुसणे यापेक्षा मोठी ईश्वरसेवा असू शकत नाही असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अनाथ, दिव्यांग, पती हरपलेल्या महिला अशा सुमारे ४५ कुटुंबांना वर्षभराचे धान्य, खाद्य तेल, जीवनावश्यक वस्तू व अल्पशी आर्थिक मदत देऊन पोळ्याचा सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तर मुख्याध्यापक मेश्राम यांनी होतकरू विद्यार्थ्यांना थोर पुरुषांचे चरित्र पुस्तके व एक पेन भेट दिला. प्रास्ताविक प्रा. बेदरकर यांनी मांडले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक मेश्राम यांनी केले. आभार डॉ. लंजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी धनेंद्र भुरले, अमित डोंगरे, जागृत सेलोकर, राधा नानवाणी, समीर गडपायले, धुर्वे, जयपाल ठाकूर, चंदेल आदींनी सहकार्य केले.
------------------------------
मदतीला धावून आले दानदाते
गरजूंसाठी आमदार विनोद अग्रवाल, सहयोग मल्टी नॅशनल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, आरती चवारे, साई प्रोव्हिजनचे लारोकर, नानन बिसेन, यशोधरा सोनवाने, वैद्य, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. मंगेश वानखेडे, जिल्हा परिषद बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था, कालू अग्रवाल, प्रकाश जडेजा, रेखा भोंगाडे आणि ग्रुप, अर्चना देशमुख, डॉ. सुजाता ताराम, प्रिया म्हैसकर, रोशन जायस्वाल, वैशाली कोहपरे, सीमा डोये, भालचंद्र ठाकूर, अशोक अग्रवाल, अंकीत तिडके, भगवान नंदागवळी, मुख्याध्यापक अनिल मेश्राम, संध्या बोरकर, मंजूषा कार्लेकर, हिंमत मेश्राम आदींनी मदतीचा हात दिला.