लोकमत न्यूज नेटवर्कगोंडमोहाळी : तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत नहरटोला येथील संगणक मागील सहा वर्षांपासून गायब आहेत. यामुळे लोकांना आॅनलाईनची व इतर संगणकाची कामे करण्याकरिता खासगी इंटरनेट कॅफेवाल्यांकडे जावे लागते. या संगणक बेपत्ता झाल्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत नहरटोला येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा हलगर्जीपणा दिसून येतो. असा आरोप गावातील काही जबाबदार व्यक्तिंनी केला आहे.सरकारी साहित्याची अशी अफरातफर करणाºया ग्रामसेवक व ग्रामपंचायतमधील संबंधीत दोषींवर प्रशासनाने योग्य ती कठोर कारवाई करावी. तसेच बेपत्ता झालेले संगणक व प्रिंटर ग्रामपंचायतला उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना करावी, अशी समस्त गावकºयांची मागणी आहे.ग्रामपंचायत नहरटोला येथील ग्रामसेवकांनी बेपत्ता झालेल्या संगणकाबाबत तोंडी माहिती दिली. त्यांच्या माहितीप्रमाणे तेथील संगणक हे मागील ३ महिन्यांपासून दुरूस्तीकरिता दिले असल्याचे सांगितले. मात्र ते गावकºयांची दिशाभूल करित असल्याचा आरोप गावातीलच काही व्यक्तींनी केला आहे. सदर ग्रामसेवकाकडे प्रिंटर संदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांनी सदर प्रतिनिधीला तुम्ही कुणाच्या परवानगीने माहिती मागायला आले आणि तुम्ही माहिती विचारणारे कोण? असे उलट उत्तर दिले.नहरटोलाचे सरपंच यांनीसुद्धा संगणकाबद्दल माहिती दिली की, मी जेव्हापासून ग्रामपंचायत नहरटोला येथे सत्तेवर आलो तेव्हापासून येथील संगणक बेपत्ता आहेत, असे सांगितले. यावरुन असे दिसून येते की ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगणक बेपत्ता झाल्याच्या माहितीमध्ये किती तफावत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन यातील दोषींवर जिल्हा परिषद पंचायत विभागाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी गावातील काही नागरिकांनी केली आहे. यासंबंधीची तक्रार देखील आहे.
ग्रामपंचायतचे संगणक व प्रिंटरच बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 9:21 PM
तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत नहरटोला येथील संगणक मागील सहा वर्षांपासून गायब आहेत. यामुळे लोकांना आॅनलाईनची व इतर संगणकाची कामे करण्याकरिता खासगी इंटरनेट कॅफेवाल्यांकडे जावे लागते.
ठळक मुद्देनहरटोला येथील प्रकार : कारवाई करण्याची मागणी