लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक अर्जुनी तालुक्याच्या पांढरी परिसरातील डुंडा ग्रामविकास अधिकाºयांनी शौचालयाचे बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना देयक दिले नाही. तसेच जुनेच शौचालय दाखवून रकमेची उचल केली. या प्रकरणाची तक्रार पंचायत समितीला करण्यात आल्यावर पं.स.च्या अधिकाºयांकडून सदर ग्रामपंचायतची चौकशी करण्यात आली.सदर ग्रामपंचायत कार्यालयात रुजू ग्रामविकास अधिकारी बी.यू. हुड यांच्याकडे पांढरी व डुंडा ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. डुंडा ग्रामवासीयांनी, १५ आॅगस्टला तहकूब सभेमध्ये शौचालय बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना देयक न देता जुने शौचालय दाखवून देयक उचल केले, अशी तक्रार पं.स. सडक अर्जुनी येथे केली. दरम्यान ७ सप्टेंबरला पंचायत विभागातर्फे विस्तार अधिकारी एम.एस. खुणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी केली. त्यात ११ जानेवारी २०१६ मध्ये १७ लाभार्थ्यांना शौचालयांचे देयक देण्यात आले. यामध्ये गावातील काही जुन्या शौचालयांचे देयक असल्याचा आरोप ग्रामविकास अधिकाºयांवर आहे.त्याचप्रमाणे १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा आचार संहिता लागण्यापूर्वी सात दिवसांमध्ये घेणे अनिवार्य होते. परंतु ग्रामविकास अधिकाºयांनी ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीदरम्यान गोंधळ उडाला. झाडे लावा झाडे जगवा, या उपक्रमामध्ये डुंडा ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावांमध्ये ४०० झाडे लावण्यात आले. परंतु झाडे लावले त्या दिवसांपासून झाडांचे संगोपन झाले नसल्यामुळे कितेक झाडे सुकली आहेत. यासाठी जबाबदार कोण? असा सवाल चौकशीदरम्यान गावकºयांनी उपस्थित केला. परंतु अधिकाºयांनी कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकशीदरम्यान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हजर झाले नाही. याविषयी ग्रामपंचायत कार्यालयातील उपस्थित पदाधिकाºयांना विचारणा करण्यात आली. मात्र आम्हाला ग्रामविकास अधिकाºयांनी कसल्याही प्रकारची सूचना न दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डुंडा येथील ग्रामविकास अधिकाºयांची गैरकारभाराबाबत व शौचालयांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रत्येक शौचालय लाभार्थ्याच्या घराची चौकशी करुन त्यांचे बयाण घेऊ. जर त्यामध्ये दोषी आढळले तर दोषींवर कारवाई केली जाईल व चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाºयांना पाठविण्यात येईल.-एम.एस. खुणेविस्तार अधिकारी,पं.स. सडक अर्जुनी
ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 9:09 PM
सडक अर्जुनी तालुक्याच्या पांढरी परिसरातील डुंडा ग्रामविकास अधिकाºयांनी शौचालयाचे बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना देयक दिले नाही. तसेच जुनेच शौचालय दाखवून रकमेची उचल केली.
ठळक मुद्देदोषींवर कारवाई करा : ग्रामविकास अधिकाºयाचा भोंगळ कारभार