अर्जुनी मोरगाव तालुक्यात अशी अनेक गावे आहेत. त्यामध्ये आदिवासी कुटूंबाची संख्या जास्त आहे. अशा गावामध्ये आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जातात तेव्हा त्यांना आदिवासी कुटुंबाकडून अज्ञान व अंधश्रध्देमुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या भागातील लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येते. कोरोना लस घेतल्यामुळे दोन वर्षात मृत्यु होतो. नंपुसकता येते, महिलांना गर्भधारणा होत नाही असे गैरसमज आदिवासी कुटुंबातील नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने स्विकारुन प्रत्येक गावातील लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्यासाठी शासनाला सहकार्य करावे अशी मागणी केली जात आहे. शासन काही कालावधी निश्चित करुन त्या कालावधीत शंभर टक्के कोरोना लसीकरण मोहीम राबविल्यास अशा ग्रामपंचायतींना गाव विकासासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर केला जाणार आहे.
लसीकरणाचा गैरसमज दूर करण्यासाठी ग्रा.पं.ने पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:36 AM