शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:21 AM

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन ...

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. त्यामुळे ऑनलाईनवर शाळांचा डोलारा सुरू आहे. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक यांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

................

जिल्ह्यातील एकूण गावे : ९३६

जिल्ह्यातील एकूण शाळा

जिल्हा परिषद : १०३९

अनुदानीत : ३४५

कायम विना अनुदानित : २४५

.................

कोरोनामुक्त असलेली गावे : ९१०

..................

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

गोंदिया

गोरेगाव

तिरोडा

अर्जुनी मोरगाव

सडक अर्जुनी

आमगाव

सालेकसा

देवरी

...............

आतापर्यंत २० ग्रामपंचायतींचा ठराव

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून, तिरोडा तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त आहे, तर इतर सात तालुक्यांत चार ते पाच रुग्ण आहेत. दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीसुद्धा चिंता वाढली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव मंजूर करून शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

...........

पालकांची हा ......

मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, शाळा सुरू झाल्यास आम्हीसुद्धा पाल्यांना शाळेत पाठवू. - देविदास उमक, पालक.

.................

जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्व व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही, तर मुले घरच्या घरी राहून त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू. - संगिता गुप्ता.

...............

शासनाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव आणि पालकांची एनओसी मागितली जात आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येतील.

- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी.

....................

१०३९ शाळा आहेत सज्ज

- नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

- इयता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून, त्यासाठी १०३९ शाळा सज्ज आहे.

- शालेय परिसर, वर्गखोल्यांची साफसफाई आणि रंगरगोटीसुद्धा करून ठेवण्यात आली आहे.

- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत.