गोंदिया : इयत्ता ८वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाने विचार केला आहे. १५ जुलै रोजी सुरू होणाऱ्या या शाळांना आधी शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायत यांच्या परवानगीचा ठराव मागविला आहे. गोंदिया जिल्ह्यात वर्ग ८ ते १२वीच्या ३७२ शाळांपैकी १४२ शाळा सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी घेतला आहे. त्यामुळे या शाळा गुरुवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात वर्ग ८ ते १२वीच्या ३७२ शाळा असून, २३० शाळांसंदर्भात ठराव शिक्षण विभागाला अद्याप प्राप्त झालेला नाही. आमगाव तालुक्यातील ३२पैकी २२ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ४३ शाळांपैकी १७ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. देवरी तालुक्यातील ३५पैकी १७ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. गोंदिया तालुक्यातील १०९पैकी १४ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. गोरेगाव तालुक्यातील ४२पैकी २६ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. सडक - अर्जुनी तालुक्यातील ४३पैकी १७ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. सालेकसा तालुक्यातील २७पैकी ४ शाळा सुरू करण्याचा ठराव आला आहे. तिरोडा तालुक्यातील ४१पैकी २५ शाळा सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली आहे.