शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

ग्रामसेविकेला ठोठावला दंड

By admin | Published: June 15, 2015 12:47 AM

पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) येथील ग्रामपंचायत सचिव गायत्री शहारे यांनी अर्जदार प्रभाकर लोणारे यांनी ...

प्रती दिवस २५० रूपये दंड : माहिती न देणे भोवले कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) येथील ग्रामपंचायत सचिव गायत्री शहारे यांनी अर्जदार प्रभाकर लोणारे यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास विलंब केला. यासाठी राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांनी एका आदेशानुसार २५० रुपये प्रति दिन प्रमाणे ३२ दिवसाचा दंड ठोठावला आहे.प्रभाकर लोणारे यांच्या आईच्या घरासमोरील त्यांच्या खाली प्लॉटवर त्यांच्या नातलगांपैकी काहींनी अतिक्रमण करुन घरकुलाचे जबरदस्तीने बांधकाम केले. यामुळे लोणारे यांना जाणे येणे करण्याला मार्ग नसल्याने त्यांचा मार्ग बंद झाला. मार्ग नसल्याने घरुन मुख्य रस्त्यावर येण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यावरुन त्यांनी पवनी दिवाणी न्यायालयात केस सादर केली. केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. अवैध बांधकाम न्यायालयाने पाडण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत कार्यालयीन सचिव गायत्री शहारे यांनी लोणारे यांना कार्यालयीन मदत तर कधीच केलीच नाही. प्लॉट संबंधीची माहिती न्यायालयीन केसमध्ये गरज असतांना माहिती अधिकाराचा उपयोग करुन माहिती मागितली असता देखील ती वेळेवर दिली नाही. तसेच खरी माहिती दडवून अर्जदार लोणारे यांना माहिती देताना ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कागदपत्रावर खोडतोड तसेच कागदाचे तुकडे लावून सत्यप्रत देण्यात आले. तसेच प्लॉटची लांबी रुंदी कमी करुन ठेवली आहे. म्हणून त्यांनी राज्य माहिती आयुक्त राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांचेकडे अपील केले. त्यापूर्वी जन माहिती अधिकारी ग्रामसेविका यांच्या विरोधात प्रथम अपील विस्तार अधिकारी पंचायत समिती पवनी येथे दाखल केले होते. तिथे देखील योग्य न्याय मिळाल्याने त्यांनी अखेर माहिती आयुक्त यांच्याकडे अपील केले होते.अर्जदार लोणारे यांनी जैनाबाई तुळशीराम लोणारे रा. पालोरा (चौ.) यांच्या घराचे सन २००३-२००४, २००४-०५ या वर्षातील नमुना १० कराबद्दल मागणी पावतीची सत्यप्रत व नमुना ०८ मिळणेबाबत माहितीचा अर्ज केला. पण त्याची माहिती देण्यास टाळाटाळ व उशीर केल्याने अखेर ग्रामसेविका यांचेवर २५० रुपये प्रति दिन ३२ दिवस विलंब केल्याने ८ हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहे. तसेच अर्जदाराचे अपील अंशत: मंजूर करत केस दाखल केली आहे. या प्रकरणात राज्य माहिती आयुक्त काय आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. या दंडात्मक कारवाईने माहिती कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)