सडक-अर्जुनी : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने धरणे आंदोलन केले.
ग्रामसेवकांच्या मागण्यांची पूर्तता करण्याविषयी असहकार आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामसेवक संवर्गावर होणारा अन्याय दूर करून विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १६ ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याची ३० ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास १ सप्टेंबरपासून ग्रामपंचायत अभिलेख बंद करून आलमारीची चाबी व शिक्का गटविकास अधिकाऱ्यांना सुपुर्द करून बेमुदत साखळी धरणे आंदोलन पंचायत समितीसमोर करणार असल्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष बी.टी. खोटेले यांनी सांगितले. आंदोलनात ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष बी.टी. खोटेले, उपाध्यक्ष आर.डी. देशमुख, सचिव बी.के. चव्हाण, कोषाध्यक्ष ओ.एन. कापगते, सदस्य सिंधू सूर्यवंशी, मसीद, जी.एस. नागलवाडे, एच.एस. मेंढे, एन.वाय. गोमासे आणि संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक सहभागी झाले आहेत.