शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

विविध ठिकाणी महामानवाला अभिवादन

By admin | Published: April 15, 2016 2:25 AM

संविधानाचे जनक, आणि तमाम दीनदलितांना जगण्याची नवीन उमेद देणारे क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जिल्हाभरात...

गोंदिया : संविधानाचे जनक, आणि तमाम दीनदलितांना जगण्याची नवीन उमेद देणारे क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.संस्कार हायस्कूल गोंदिया : संस्कार इंग्रजी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या प्रांगणावर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे संचालक मधू बंसोड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमा घेण्यात आला. मुख्याध्यापिका जयश्री फुले, सिंधू धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आशान्वित जनबंधु, यश धमगाये, श्रुतिका जनबंधु, प्रांशु चित्रीव, प्रतिक्षा चौव्हाण, पारस डोंगरे, निखिल वर्मा, अनिश शेख, स्मिथ मेश्राम इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गीतगायन स्पर्धेमधून बाबासाहेब यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना व कार्य यांचे प्रदर्शन केले. तसेच, चित्रकला स्पर्धेतून बाबासाहेबांया जीवनाशी संबंधीत महाडच्या चवदार तळ्याचे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश इत्यादींवर चित्ररेखाटन केले. निबंध स्पर्धेमधून त्यांचा जीवनवृत्तांत व समाजकार्याविषयी माहिती लिहिली. या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आशान्वित जनबंधु आणि द्वितीय क्रमांक यश धमगाये यांना देण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षिका नलिनी चौव्हाण, शिल्पा मेश्राम, भाग्यशाली कठाने, वर्षा पारधी, ममता मानकर, सृष्टी अग्रवाल, लक्ष्मी देशमुख, विजया उके, रक्षा थापा, अनिता चोरनेले इ. शिक्षिका आणि सर्व विद्यार्थ्यांनी हर्षोउल्हासाने सहभाग घेतला. मनोहर म्युनिसिपल स्कूल गोंदिया : नगर परिषद, गोंदियाद्वारा संचालित मनोहर म्युनिसिपल हायर सेकडंरी स्कूल येथे मुख्याध्यापक उल्हास राजनकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. नरेद्र गणविर, पर्यवेक्षक राजेंद्र धाबर्डे, वरिष्ठ शिक्षक हेमराज शहारे, सुधीर रहांगडाले, भुवनकुमार बिसेन, हेमराज बोकाडे, रविशंकर बिसेन, दिप्ती तावाडे प्रामुख्याने हजर होते. याप्रसंगी बाबासाहेबांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून आदरांजली व्यक्त केली गेली. राजनकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकर यांच्यासारखे विद्याव्यासंगी होऊन अविरत शिक्षण घेत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भारतीय संविधानाची प्रास्ताविका सामूहिकरित्या वाचन करण्यात आली. कार्यक्रमात सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी हजर होते. संचालन सहायक शिक्षक दामोदर धुवारे यांनी केले.यशस्वी आयोजनासाठी सहायक शिक्षिका सुलभा चौधरी, अजेशकुमार टेकाम, मधुकर जाधव, शिवकुमार उपरीकर, प्रदीप यादव, किशोरकुमार तावाडे, प्रमोद सोनवाने, दुर्गा राठौर, प्रिया साळवे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले. विदर्भ पाटबंधारे विभाग गोंदिया : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पत.संस्था मर्यादित नागपूर अंतर्गत शाखा गोंदिया येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी गोंदिया शाखेचे तज्ज्ञ संचालक सु.ज.रिधनार्थी, उप कार्यकारी अभियंता पी.के.झा, एस.बी.भोयर, मंगरू हिरापुरे, खेमचंद शेंडे, एम.आर.चौरागडे, कुरसुंगे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी सचिन सोनवाने मुकेश लामटे आदी उपस्थित होते. लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था बाराभाटी : जवळच्या येरंडी/देव. येथे लोेककला साहित्य सेवाभावी बहु. संस्थेत राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष एम.आर. नंदागवळी, के.ए.रंगारी, उपाध्यक्ष गुरूदेव रामटेके, सचिव चंदू तिरपुडे, नंदेश्वर रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था बाराभाटी : स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्यादीत बाराभाटी र.नं. १४२१ येथे बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लिलाधर ताराम, उपाध्यक्ष अनिल दहिवले, सचिव एल.बी.बागडे, तुलाराम मारगाये, ईश्वर प्रधान, लैलेश शिवणकर, शांताराम राखडे, किसन बोरकर, गोविंद बोरकर, श्रीराम ताराम, मदन शहारे, प्रमोद रहेले, बिरणबाई चव्हारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर चौकगोंदिया : भाजपातर्फे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. स्थानिक आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी अध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष भावना कदम, न.प.अध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प.सभापती छाया दसरे, महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, दीपक कदम, भरत क्षत्रिय, धनंजय वैद्य, शंभु ठाकुर, धर्मेद्र डोहरे, कुशल अग्रवाल, संजय मुरकुटे, मीनु बडगुजर, आत्माराम दसरे, अजय लौंगानी, रिषीकांत साहू, प्रदीप ठाकूर, डॉ. अमित बुध्दे, अहमद मनियार, महेश आहूजा, मनोहर आसवानी, अशोक जयसिंघानी, सविता तुरकर, सुनिता हेमणे, अमित झा, बंटी पंचबुध्दे, अभय अग्रवाल,डॉ. राजा कदम, मुकेश हलमारे, बाबा बिसेन, सुरेश चंदनकर, डॉ. शालिनी डोंगरे, पंकज सोनवाने, निरजसिंग ठाकुर, मोहसीन खान, रोहित अग्रवाल उपस्थित होते. तसेच पालकमंत्री कार्यालयात माल्यार्पण करण्यात आले. गोंदिया पब्लिक शाळा गोंदिया : डी.बी.एम.शिक्षण संस्थाद्वारे संचालित गोंदिया पब्लिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर रजत जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रीता अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्यवस्थापक प्रफुल वस्तानी हे होते. संस्थाध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे, संस्था सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका पारधी यांनी केले. इटखेड्यात विविध ठिकाणी जयंतीइटखेडा : ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा मूलमंत्र देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती ग्रामपंचायत कार्यालय, इसापूर-इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञान विकास वाचनालय, जि.प.प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आनंद बुध्द विहार येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करीत मान्यवर अतिथींनी त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सरपंच अस्मिता वैद्य, उपसरपंच वासुदेवराव उके, सुशिला गोंडाणे, प्राचार्य लहू बोळणे, प्राचार्य विश्वनाथ डांगे, मुख्याध्यापक यशवंत शेंडे, पर्यवेक्षक भुवन झोडे, वाचनालयाचे अध्यक्ष मोरेश्वर भावे, सचिव पुंडलिक धोटे, राकेश कोल्हे, नितीन धोटे, सदाशिव लांडगे, राहुल गोंडाणे, अतुल वलथरे, जयप्रकाश करंजेकर, पुष्पा फुंडे, पद्मजा मेहंदळे, पूर्णचंद्र धोटे, पोलीस पाटील विकास लांडगे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, चेतन शेंडे, कुंता कोकोडे यांची उपस्थिती होती. आनंद बुध्द विहारामध्ये झालेल्या कार्यक्रमात स्थानिक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुध्द, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. माजी प्राचार्य लक्ष्मण माटे, जगन गडपाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा गौरव करीत त्यांची शिकवण अंगीकारण्याचे आवाहन केले. इस्तारी वासनिक, प्रकाश देशपांडे, सिध्दार्थ सुखदेवे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर गोंडाणे यांनी केले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यानी ग्रामरस्त्यावरून पथसंचलन करीत जनजागृती केली. महावितरण परिमंडळ व मंडळ गोंदिया कार्यालयगोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त महावितरण परिमंडळ व मंडळ गोंदिया कार्यालयाचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. १३ व १४ एप्रिल रोजी करण्यात आले. त्यामध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पुस्तके प्रदर्शन व मान्यवरांचे मार्गदर्शन, अधिक्षक अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व महावितरणतर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबानिंबा-तेढा : गोरेगाव तालुक्यातील केंद्र मोहगाव/तिल्ली अंतर्गत येणाऱ्या जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळेत गीतगायन व भाषण स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक जे.जे.पटले यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन आर.डी.बन्सोड यांनी तर आभार आर.एच.नंदेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.एफ.पटले, आर.के.पारधी, के.डी.चौरागडे यांनी सहकार्य केले. ग्रामपंचायत कार्यालय चांदोरी खुर्दपरसवाडा : चांदोरी खुर्द ग्राम पंचायत कार्यालयात १२५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लिला गोंधुळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच हुपराज जमईवार, फुलन नखाते, मालती नंदेश्वर, नभी मालाधारी, भाऊलाल अंबुले, बळीराम धांडे, ताराचंद नखाते, शाहील मालाधारी, दुर्गा अंबुले, दिलीप बाविसताले, रामरतन शिवणकर, तोषीब मालाधारी, मुन्ना नंदेश्वर उपस्थित होते. ग्रामपंचायत सातगाव साखरीटोला : ग्रामपंचायत सातगाव (साखरीटोला) येथे जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या लता दोनोडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, माजी समाजकल्याण सभापती श्रावण राणा, सरपंच संगीता कुसराम, ग्रा.पं.सदस्य अरविंद गजभिये, कांता लांजेवार, विना गणवीर, प्राचार्य सागर काटेखाये, वन समितीचे अध्यक्ष विजय येळमे, संजय कुसराम, प्रकाश राऊत, बबलू बैस उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने सर्वाननी सामाजिक सौहार्द व सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समताधिष्ठीत समाज समाज निर्माण करण्याचे स्वप्न साकार करू असे अभिवचन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक संतोष कुटे यांनी केले. शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महा. कोटजमूरा सालेकसा : शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटजमूरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहपूर्वक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.आर.माहुले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून व्ही.एम.मानकर, एस.जे.लिल्हारे, व्ही.पी.ढेकवार, एस.ए.मोारे, एच.पी.बंसोड, जी.आर.कुराहे, एम.के.नागपुरे, लिल्हारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला बाबासाहेबांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विजय मानकर यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डी.आर.माहुले, एस.जे.लिल्हारे, व्ही.पी.ढेकवार, एच.पी.बंसोड, मोहारे यांनी ही संबोधीत केले. संचालन व आभार सी.बी.नागपुरे यांनी मानले. छत्रपती दुबे नगर परिषद प्राथमिक शाळा तिरोडा : स्थानिक डॉ. छत्रपती दुबे नगर परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम मुख्याध्यापिका डी.डी.गिरीपुंजे यांचे अध्यक्षतेखाली एम.आर.काशिवार, आशा खोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका गिरीपुंजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक रोहन नेवारे, संचालन व आभार प्रदर्शन सार्थक बागडे यांनी मानले. यावेळी पलक बागडे, अवनी गजापुरे, यामीनी गाळे, गायत्री डडुरे, हर्ष कोहळे, ओम भोंडे, भावना नंदरधने, अवंतीका गजापुरे, सुजल मेश्राम, प्राची नंदरधने प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थी संगठन ने केली जयंती साजरी गोंदिया : वाल्मिकी, सुदर्शन, मखियार आणि उत्कल समाजाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. सर्वप्रथम संघटनेच्या विद्यार्थ्यानी डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करून दीप प्रज्जवलन केले. यानंतर सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अमित बघेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एकदुसऱ्यांना बाबासाहेबांच्या आदर्शाचे पालन करून त्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात राजेश बघेले, अभिजीत रघुवंशी, विकास माटे, शुभम ईमलाह, अक्कू अरखेल, साहिल शेंद्रे, अनिकेत सांडेकर, रु पेश सोनेकर, करण दीप, प्रेम बघेले, योगेश छिडमलक, दर्वेश दीप, अभिषेक दीप, पियूष दीप आदी उपस्थित होते.कोल्हटकर कॉलेजगोंदिया : आसोली येथील के.एम. कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात बाबासाहेबांची जयंती गीत, भाषण तसेच निबंध स्पर्धा घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय टेंभरे होते. आभार प्रा.सीमा पटले यांनी केले. प्रा.नितेश गायधने, प्रा.सीमा पटले, प्रा.डिलेश्वरी बिसेन, प्रा.बोरकर, प्रा.गडपायले यांनी सहकार्य केले.