अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एच. जिवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शिक्षक यू.सी. रंहागडाले, एस.आर. बघेले, प्रा.सुनील लिचडे, प्रा.एस.सी. सुंकरवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्रासमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाला शिक्षक प्रा.राजेश चटर्जी, बी.आर मेश्राम, प्रदीप राठोड, पी.जी.परशुरामकर, जी.एम.दुधबरई, राजेश निमावत, एन.एस.अग्रवाल, एस.एन. मोरघडे, एम.पी. भोयर, डी.जे. डोमळे, डी.एस. साखरे, विजय वासनिक, कान्हा बघेले, प्रा.रवी लिल्हारे, प्रा. अर्चना उपवंशी, प्रा. प्रियंका भालाधरे, प्रा.संदीप पटले, आर.बी. दमाहे, शक्ती मस्करे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन विद्यालयातील सहायक शिक्षक व क्रीडा प्रभारी जी.एम. दुधबरई यांनी केले.
शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:32 AM