याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. एन.डी. किरसान यांनी, डॉ. श्रीकांत जिचकार हे एक उच्च विद्या विभूषित व सर्वांत जास्त शिकलेले म्हणून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये झाली आहे. त्यांनी राजकारणासोबतच समाजाला मार्गदर्शन करून परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रदेश सचिव अमर वराडे, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, माजी सभापती पी.जी. कटरे, ॲड. पी. सी. चव्हाण, काँग्रेस युवा नेता अशोक गुप्ता, सोशल मीडिया अध्यक्ष ॲड. योगेश अग्रवाल, रमेश अंबुले, जितेंद्र कटरे, परवेज बेग, जितेश राणे, आलोक मोहती, राधेलाल पटले, वासुदेव चुटे, सूर्यप्रकाश भगत, सजय बहेकार, गौरव बिसेन, झहिर अहमद, संदीप भाटिया, राजू काळे, बळीराम कोठवार, ओमप्रकाश पटले, परेश उजवणे, अनिल दहिवले, ढमेंद्रसिह चव्हाण, दलेश नागदवने, मंयक झंझाड, बाबुलाल रंहागडाले, जीवनलाल शरणागत, राजकुमार बागडे, मुरलीलाल मस्करे, नीलम हलमारे, राजकुमार पटले, सचिन मेश्राम, डॉ. देवाजी कापगते, राजेंद्र दुबे, मधुसूदन दोनोडे, मंथन नंदेस्वर, अशोक बघेले, रवी क्षीरसागर, पंकज पिल्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीकांत जिचकार यांना केले अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:22 AM