गोंदिया : लोधी क्षत्रिय समाजाच्यावतीने तालुक्यातील ग्राम रतनारा-पाटीलटोला येथे विरांगना अवंतीबाई यांच्या १६३ व्या बलिदान दिनानिमित्त त्यांना शनिवारी (दि. २०) अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने आदिवासी लोककला नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते अवंतीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आमदार अग्रवाल यांच्या हस्ते लोकलला नृत्य कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अग्रवाल म्हणाले, अवंतीबाईंनी इंग्रज राजवटीला हादरवून सोडले होते. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान विसरता येणार नाही. शहिदांमध्ये त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छाया दसरे, माजी सदस्य अर्जुन नागपुरे, प्रकाश रहमतकर, धनलाल ठाकरे, धनेंद्र अटरे, नेहरूप्रसाद उपवंशी, रेखा चिखलोंडे, राजेंद्र लिल्हारे, आय. बी. कुरेशी, हेमेंद्र पाचे, राजीव ठकरेले, सूर्यकांत नागपुरे, नंदकिशोर बिरनवार, रामप्रसाद कंसरे, धनपाल धुवारे, दुर्योधन भोयर, सतीश दमाहे, चुन्नीलाल बोरकर, दुर्गा दमाहे, सुप्रिया गणवीर, ओमेश्वरी ढेकवार, सीमा मोहारे, कौशल्या डोंगरे, किरण डोहरे, रंजिता मेश्राम, दयावंती लिल्हारे, दयाबाई राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.